
धान ऐवजी भरडधान्ये घ्या, करोडो लिटर पाणी बचत होईल.
मिलेटस्/Millets म्हणजे काय?
मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असेही म्हटले जाते.
मिलेटस् चा इतिहास 5000 ते 6000 वर्षा पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात , ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती, त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली, गव्हाचे व तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबगड्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच ही भरडधान्ये म्हणजे डोंगर कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्या सारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती व पोळीने मैदा पाव बिसकुटाने, तांदळाच्या भाताने अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते, अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती.
आता आपले डोळे उघडले आहेत, आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे, आणि परत आपल्याला पूर्वीच्या प्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे.
मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन् जैवसाखळी/Biodiversity पुनर्रस्थापना, पर्यावरण,अर्थकारण यामध्ये मिलेटस् ची भूमिका काय हे समजून घेऊया*
— संपूर्ण देशभर असणारी दुष्काळी परिस्थिती व शेतीच्या पाण्याची उपलब्धता पाहता हे भरडधान्याचे पीक कुठेही येऊ शकते, अगदी एकदोन पाण्यामध्ये वा फक्त पावसाच्या पाण्यावर सुद्धा, खते औषधे किटकनाशके रसायने लागत नाहीत म्हणजे पर्यावरणप्रिय, सेंद्रिय व विषमुक्त शेती असे समजूया. मिलेटस् /भरडधान्ये शेती म्हणजे जंगल फार्मिंग/naturally grown & minimum care crops अर्थात कसलीही इनपुटस न देता, अगदी तीनचार महिन्यात छान पीक काढणीस तयार होते. म्हणजे अल्प भांडवल, उत्तम आरोग्यदायी अन्न, जनावरांना चारा असा चौफेर फायदा.
1 किलो गहू तयार करण्यासाठी 1000 लिटर पाणी लागते, 1 किलो तांदूळ (paddy rice) तयार करण्यासाठी 8000 ते 9000 लिटर पाणी लागते. परंतु 1 किलो मिलेटस् /भरडधान्ये तयार करण्यासाठी फक्त 200 लिटर पाणी लागते, म्हणजे मिलेटस् च्या तुलनेने गव्हाला तांदळाला जवळजवळ चाळीस ते पन्नास पट पाणी अधीक लागते. तसेच 1 किलो गहू, तांदूळ मध्ये चार लोक पोट भरू शकतात, परंतु 1 किलो भरडधान्ये/मिलेट मध्ये बारा लोक पोट भरू शकतात, म्हणजे तुम्ही तुलना करा किती मोठी फुड सेक्युरीटीआपण निर्माण करू शकतो, आता यामागील अर्थकारण पाहुया. साधारणपणे 80 ते 150 रूपये किलो ह्या दराने बाजारात मिलेट/भरडधान्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत, म्हणजे यातून शेतकऱ्यांचे फार मोठे अर्थकारण साधता येणार आहे.
वेगवेगळी मिलेटस्/भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी फायदे
गहू आणि तांदूळ(paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा वा इतर आजार बळावले जातात.
आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची:– कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते, हे गहू तांदूळ मध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना व रोगांना आमंत्रण देतात. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हेच असते. परिणामी डायबिटीस लठ्ठपणा रक्तदाब कैंसर सांधेदुखी वा इतर विविध शारीरिक विकार. हे आजार विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.
मिलेटस् ग्लुटेन फ्री फुड आहे सध्या सर्वञ चर्चा आहे ना ते हेच , म्हणजेच भरडधान्ये आपण आहारात समाविष्ट केल्याने हे जीवनशैलीचे आजार विकार रोग आपण सहज टाळू शकतो, Industrial food काय कामाचे हे आपण स्वतःला विचारणार आहोत की नाही.
मिलेटस् / भरडधान्ये खालीलप्रमाणे
1) ज्वारी/ Sorghum millet – प्रकृतीने थंड, उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खावी, Glutein free, भाकरी लाह्या पोहे बनवून खाऊ शकतो.
2) बाजरी/ Pearl Millet — उष्ण प्रकृतीचे, बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी. कैल्शियम आयर्न मुबलक, गरोदर माता, स्तनदा माता यांनी जरूर बाजरी खावी, फायबर्स खूपच असल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
3) नाचणी/ रागी / Finger Millets – नाचणीला Nutrients Powerhouse असे म्हणतात. नाचणीचे दूधही/Ragi milk तयार करता येते, आणि ते खूप पौष्टिक असते.
4) राळे वा कांगराळे/ Foxtail millet – राळ्याचा भात खिचडी पोहे असे पदार्थ बनतात. मेंदू आजार विकार, गरोदर मातांच्यासाठी खूप चांगले, अस्थिरोग/हाडांचे रोग व विकार, स्पाईन/मज्जारज्जू संदर्भातील आजार विकार यात फायदेशीर आहे.
5) वरी वा वरीचे तांदूळ वा भगर / Barnyard Millet – उपवासासाठी, अल्प उष्मांक अन्न / low calorie food, कैल्शियम आयर्न खूप जास्त प्रमाणात, फायबर्स खूप जास्त म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, लिव्हर, किडनी, पित्ताशय/gall bladder आजारात फायदेशीर, endocrine glands functioning मध्ये महत्त्वाचा रोल व शुद्धिकरणासाठी
6) कुटकी /Little millets – डायबिटीस, थायरौईड, नपुंसकता ह्या विकारात फायदेशीर, कुटकीचा भात पोहे पापड बनतात.
7) हिरवी कांगणी/ Browntop millets/ Green millets – हिरव्या कांगणीत सर्वाधिक 12.5 % फायबर्स असतात, मुळव्याध पाईल्स अल्सर मध्ये जादुई परिणाम, मज्जारज्जूचे विकार आजार, ह्या ब्राऊन टोप मिलेटची लापशी फारच छान बनते. spine disorders & diseases मध्ये फायदेशीर,
8) कोदरा / Kodo millets/ Himalayan millet –
पंजाब मध्ये पूर्वी खूप खात होते, शीख धर्मगुरू गुरूनानकजी कोद्र्याचा भात, भाकरी व साग खात होते, आता बोटावर मोजण्याइतकी शेती केली जातेय कोद्र्याची पंजाब मध्ये, रक्त शुद्धिकरण, हाडीताप(fever), Bone marrow disorders मध्ये फायदेशीर (अस्थिमज्जा आजार विकार), मंदाग्नी प्रदिप्त करतो म्हणजे पोटात पाचकरस digestive enzymes वाढवतो भूक वाढवतो.
9) राजगीरा/ Sudo millets/ Amaranthus – राजगीरा चे लाडू, वडी , राजगीरा दूधात टाकून खाल्ला जातो, लहान मुलांना फार पौष्टिक
गहू / तांदूळ (Paddy) आणि भरडधान्ये यांत मूलभूत फरक काय
— गहू तांदूळ आणि भरडधान्ये यांत पिष्टमय पदार्थ /स्टार्च , फैटस्, काहीअंशी प्रोटिन्स सेम असतात , परंतु भरडधान्ये मध्ये फायबर्स/तंतुमय पदार्थ खूपच असतात , जे गव्हामध्ये फक्त 1.2% असतात , तर तांदूळ /paddy मध्ये 0.2% इतके असतात, खरी ग्यानबाची मेख येथेच आहे, तसेच भरडधान्यात विटामिन्स खनिजे फायटोकेमिकल्स प्रचंड प्रमाणात असतात, गव्हात अन् तांदूळात फारच कमी असतात. मिलेटस् मधील फायबर्स आणि पिष्टमय पदार्थाचे एक विशिष्ट linking असते, ज्यामुळे मिलैटस् खाल्ल्यावर हळूहळू रक्तात साखर सोडली जाते, म्हणजे रक्तात साखरेचा पूर येत नाही, अन् आरोग्य संवर्धन होते.उलट गव्हाच्या अन् तांदळाच्या सेवनाने रक्तात साखरेचा पूर येतो, अन् चिञविचिञ आरोग्य समस्या आजारांना विकारांना सामोरे जायला लागते, आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्याला जेनेटिक डिसओरडर म्हणते.
हे सर्व आपण टाळू शकतो फक्त मिलेटस् खाद्य संस्कृतीकडे पुन्हा वळून. तसेच मिलेटस् हे ग्लुटेन फ्री अन्न असल्यामुळे स्वादुपिंडाला बळ मिळते, स्वादुपिंडाचे शुद्धीकरण होते, ग्लुटेन फ्री अन्न म्हणजे लिव्हर किडनीचा विमाच असेच समजा.
मिलेटस् असे खा*
मिलेटस् पासून पीठ, पोहे, भाकरी, धपाटे, खिचडी, पुलाव, बिर्याणी, डोसे व बिसकुट बनवता येतात. फक्त मिलेटस् खरेदी करताना एक काळजी घ्यावी , मिलेटस् पोलीश / polished केलेले नसावेत, ते त्याच्या नैसर्गिक रंगात असावेत.
मिलेटस् असे वापरा
सर्वप्रथम हलके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, म्हणजे त्यावरील माती कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत , नंतर सुकवून वाळवून वापरावेत.
एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये /तृणधान्ये/millets ला परत पुनर्रवैभव करून देणे हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे.
🌱अन्नाईची पुण्याई!🌱
जुन ते सोनं!
पोट सफा तर हर रोग दफा!
सर्वात महत्वाची बाब म्हणजे फायबर युक्त अन्नाची आज सर्वांना गरज भासत आहे!👇
ते म्हणजे भरडधान्य होय!
लेखक –
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८