फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना

0

फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना :

– फळाचा आणि शाकीय वाढीचा योग्य समतोल राखावा.
– फळझाडामधील शाकीय वाढ नियंत्रणात आणण्यासाठी बुटके खुंट रोप वापरावे.
– दोन डोळ्यातील अंतर कमी असणारी कलम काडी कलमासाठी वापरावी.
– फळझाडांना वळण देताना दोन फांद्यामधील अंतर जास्त राहील, अशा प्रकारे छाटणी करावी.
– वनस्पती वाढरोधकांचा तज्ज्ञांच्या साह्याने वापर करून शाकीय वाढ व फळांचा योग्य समतोल राखावा.

फुलांची संख्या वाढविणे :

फुलांची संख्या वाढविण्यासाठी वाढ संप्रेरकांचा वापर केला जातो. संप्रेरकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक व लेबल क्लेमप्रमाणे करावा.

फूलकळीची गुणवत्ता व संख्या 

चांगल्या प्रकारे फूलकळी निघण्यासाठी फळझाडाच्या फांद्या वाकवून घ्यावात. लवकर फळ काढणी करावी. यामुळे फांद्यामध्ये शिल्लक असलेल्या अन्नसाठ्याचा उपयोग नवीन डोळे तयार होण्यासाठी होईल. फूलकळीची संख्या चालू वर्षीच्या हंगामामध्ये मर्यादीत ठेवावी. त्यामुळे फळधारणा व बहारामध्ये सातत्य ठेवता येते.
झाडावरील फळांचा भार कमी करणे : व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या आकाराच्या, आकर्षक फळांना अधिक मागणी असते. एका झाडावर अधिक फळे घेतल्यास, ती कमी पोसल्यामुळे लहान राहतात. विरळणी करून फळांची संख्या कमी ठेवल्यास फळांची गुणवत्ता चांगली मिळू शकते. तसेच पुढील वर्षी फळधारणा चांगली होण्यास मदत होते.

पाण्याचे व्यस्थापन

फळबाग फुलोऱ्यामध्ये किंवा सेटिंगमध्ये असताना जमिनीतील ओलावा संतुलित प्रमाणामध्ये असावा. त्यामुळे झाडांच्या सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे होऊन फळधारणा चांगली होते. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्यास फळगळ होण्याची शक्यता वाढते.

अन्नद्रव्ये

फळबागेला योग्य व समतोल प्रमाणात अन्नद्रव्ये पुरवावीत. बागेमध्ये खताची शिफारशीत मात्रा बहर येण्यापूर्वी द्यावी. उत्तम फुलोरा येण्यासोबतच फळ सेटिंग चांगले होते. कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीतून किंवा फवारणीद्वारे द्यावी.उदा. द्राक्ष व संत्रा या फळपिकामध्ये फुलोऱ्यात येण्यापूर्वी जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.नत्रयुक्त खत फळबागेसाठी शेंड्याकडील नवीन डोळा तयार झाल्यानंतर द्यावे. यामुळे फुलामधील गर्भकोष चांगल्या प्रकारे तयार होतो. परिणामी अशा फळझाडामध्ये फळधारणा चांगली होते. रासायनिक खतांचा वापर असंतुलितपणे केल्यास फुलांच्या निर्मितीमध्ये बाधा येऊ शकते.

– विनोद धोंगडे

महत्वाच्या बातम्या : –

कोरोना काळातही शेती क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित

तीन वर्षांत अडीच पटीने वाढले मक्याचे क्षेत्र, ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात

रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

काकडी पीक व्यवस्थापन

Leave a comment