बरेच शेतकरी विचारत आहेत की डाळिंब साठी कल्टार वापरावे का ? त्यांच्यासाठी थोडी माहिती

0

कल्टार (पॅक्लोब्युट्रोझोल)हे संजीवक प्रामुख्याने आंबा पिका साठी वापरले जाते.चांगला मोहोर व आंबे लागण्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या डाळिंब पिका साठी याची शिफारस करता येत नाही. अशा प्रकारचे संजीवके वापरून बागेला फुल पण येतात ती फुल मोठी होऊन फळ पन होतात पण त्या फळांचे पोषण हे पानांद्वारे करण्याऐवजी झाडाचे स्टोरेज वापरून केले जाते.

पण यामुळे झाडांमधील स्टोरेज संपते झाडांना आतून भेरूंड लागतो , उभे झाड जळून जातात, खोडकीड लागते या सगळ्या समस्या निर्माण व्हायचं कारण म्हणजे झाडे आतून कमकुवत होतात जी ताकत होती ती सगळी फळांनी ओढून घेतात अश्या प्रकारे झाडाच्या जीवाची किंमत मोजून ह्या प्रकारचे उत्पादन घेणे चुकीचे आहे.
थोडक्यात कल्टार मुळे पाहिले 1-2 वर्ष उत्पन्न चांगले मिळेल पण झाडाचे आयुष्य 3-4 वर्षा वर येईल….
त्या मुळे असल्या घातक संजीवका चा वापर करण्या ऐवजी झाडाच्या पोषणावर लक्ष द्यावे फळधारणा व उत्पन्न निश्चीत वाढेल.

विक्रम घोलप 

7020845477

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या कडीपत्त्याचे औषधी उपयोग

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

वैशाखी मूग लागवडीबाबत माहिती

आरोग्याचे रहस्य भाज्यांच्या रंगात लपलेले आहे, आपण कोणती रंगाची भाजी खावी हे जाणून घ्या?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, होईल ‘भरघोस’ फायदा

Leave a comment