Poultry Shade Construction: पोल्ट्री शेड बांधकामातील महत्त्वाचे मुद्दे

0

बरेच शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन, पशूपालन आणि शेळी पालन सारखे व्यवसाय करीत असतात. परंतु या सगळ्या व्यवसायांमध्ये संबंधित पशूंचे व कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन, संगोपन या गोष्टींना जितके महत्त्व आहे इतकेच पशुपालना मध्ये गोठा व्यवस्थापनाला आणि कुक्कुटपालनामध्ये पोल्ट्री शेड ला तितकेच महत्त्व आहे

कुक्कुटपालनामध्ये शेड बांधताना कोणत्या प्रकारचे मुद्दे आणि गोष्टी लक्षात घ्याव्यात. जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा होईल आणि व्यवसाय देखील नफायुक्त होण्यास मदत होईल. या लेखात आपण पोल्ट्री शेड बांधतांना कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत याबद्दल माहिती करून घेऊ.

 पोल्ट्री शेड बांधताना लक्षात ठेवायचे मुद्दे..

 • पोल्ट्री शेड बांधतांना ते सकल जागेत बांधावी तसेच त्याची दिशाही पूर्व-पश्‍चिम असावी.कारण अशा पद्धतीने शेडचे बांधकाम जर केले नाही तर उन्हाळ्यात घुसून हवा आणि पावसाळ्यात पाण्याचा झोत कोंबड्यांना लागून ते आजारी पडू शकतात.
 • शेड बांधताना त्याची रुंदी पंचवीस आणि तीस फूट या दरम्यान असावी. तसेच शेडची लांबी जर जास्त ठेवली तर शेडमध्ये कोंबड्यांची संख्या वाढून उष्णताही वाढते. त्याचे विपरीत परिणाम पक्षांवर दिसतात.
 • जर ब्रॉयलर पक्षांचा विचार केला तर त्यांच्या वाढीचा वेग जास्त असतो. म्हणून प्रत्येक शेडमध्ये एका पक्षाला एक चौरस फूट इतका जागेनुसार जागेचे नियोजन ठेवावे व त्यानुसार शेडची लांबी वाढवावी.
 • शेडची लांबी खूपच वाढवू नये. शेडचे बांधकाम करताना आपली आर्थिक क्षमता, उपलब्ध असलेले मनुष्यबळ यांची व्यवस्थित सांगड घालून तज्ञांच्या किंवा अनुभवी कुक्कुटपालकांच्या सल्ल्याने शेडचे असे नियोजन करावे.
 • प्रत्येक पिलास पहिल्या आठवड्यात 0.25 चौरस फूट, दुसऱ्या आठवड्यापर्यंत 0.50 चौरस फूट आणि तिसर्‍या चौथ्या आठवड्यात 0.75 चौरस फूट इतके जागेनुसार नियोजन करावे.
 • 2 शेड जर शेजारी शेजारी बांधायचे असतील तर त्यामधील अंतर पन्नास फूट असावे.
 • शेडमधील कोब्याची उंची कमीतकमी दीड फूट असावी जेणेकरून शेडमध्ये आत पाणी घुसणार नाही.
 • बाजूच्या भिंती या बाहेरून 9 फूट आणि आतून बारा फूट असावी.
 • वरती पत्र्यांचा वापर करताना तो उष्णता कमी निर्माण करणारे सिमेंटचे पत्रे वापरावेत.
 • शेडच्या अवतीभवती जाळी लावावी जेणेकरून उंदीर, घूस, साप व इतर प्राणी बसणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 • शेडच्या वर पक्ष्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोन तीन पाण्याची टाकी असाव्यात. सर्व पक्षांना स्वच्छ व ताजे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. पाणी जास्त दिवस साठवून ठेवण्याचे नियोजन करू नये.
 • शेडमध्ये योग्यप्रकारे उजेड राहील याची काळजी घ्यावी व त्यानुसार इलेक्ट्रिक फिटिंग करून घ्यावी.
 • शेडमध्ये जर ट्यूबलाइट लावायचे असेल तर त्या उत्तर-दक्षिण अशा पद्धतीने लावावे. तसेच शाळेच्या बाहेरही उजेडासाठी चे सोय करावी. इन्व्हर्टर आवश्यक ठेवावे जेणेकरून भारनियमनाच्या काळात विजेची सोय होईल.

 

Leave a comment