महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली. आपली प्रकृती उत्तम असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सोबत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन दादा भुसे यांनी केले आहे.
माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) December 29, 2020
दादा भुसे यांनी ट्विट करत माहिती दिली की, माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.
दरम्यान, याआधी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांसह उपुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली होती