स्वीट कॉर्न लागवडीसाठी अनुदान कसे मिळवायचे ते जाणून घेऊया

0

राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मध्य प्रदेश सरकार स्वीट कॉर्नच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. या योजनेचा फायदा घेऊन राज्यातील शेतकरी स्वीट कॉर्नची लागवड करुन चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मध्य प्रदेश सरकार स्वीट कॉर्नच्या लागवडीसाठी अनुदान देत आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकर्‍यांना विविध प्रकारचे स्वीट कॉर्न बियाणे प्रदान करत आहे. त्याचबरोबर स्वीट कॉर्न लागवडीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि यामुळे पिकाच्या विक्रीलाही मदत होईल.

 बियाणे 

या योजनेंतर्गत स्वीट कॉर्नचे बियाणे राष्ट्रीय बियाणे महामंडळ व बियाणे व शेत विकास महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रिया स्वीट कॉर्न, एचएससी -१, विन ऑरेंज स्वीट कॉर्न, माधुरी स्वीट कॉर्न या जातीचे स्वीट कॉर्न  बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत .

किती रक्कम मिळेल

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकरी 4,००० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रति एकर 2 किलो स्वीट कॉर्न बियाणे देण्यात येईल.

ज्या शेतकर्‍याची स्वतःची शेती आहे अशा सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकनार.

स्वीट कॉर्न शेतीच्या गटात प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 100 ते 150 च्या गटात अर्ज करावा.

इंदूर, उज्जैन, नीमच झाबुआ, छिंदवाडा, रतलाम, कटनी आणि खंडवा येथील शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. परंतु अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवर तेथील शेतकरीही याचा लाभ घेण्यास सक्षम असतील.

येथे करा संपर्क

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधा.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक

बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक

भेंडी खाऊन घटवा वजन

कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार

Leave a comment