वारूळ मुंग्यांचे जग, मुंग्यांच्या वारूळा बद्दल जाणून घेऊया….

0

मुंग्या जरी आकाराने एवढ्याशा दिसत असल्या , तरी त्या सर्वव्यापी आहेत काही मुंग्यांचा अपवाद वगळता,बहुतांश प्रकारच्या मुंग्या घरे करून राहतात,मुंग्यांचे घर असणाऱ्या वारुळाची निर्मिती हे कामकरी मुंग्यांच्या अनेक पिढ्यांच्या श्रमाचे फलित असते वारुळाच्या आतील बोगदे व सज्जे ह्यांनी व्यापलेला अवकाश आणि विभिन्न आकारांनुसार त्यात सामावलेल्या मुंग्या ह्यांचा विचार केल्यास तो स्थापत्यशास्त्रासाठी एक धडा ठरू शकतो. जगभर मुंग्यांच्या वारुळाचे विविध उपयोग केले जात आहेत.वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते.तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी.शेतीतील उत्पादनवाढीसाठी आणि घरबांधणीसाठीही उपयोग होतो.

मनोरे बनवितात किंवा त्यांची दुरुस्ती करतात मुंग्या केवळ मातीचे कणच वर आणत असल्यामुळे जमिनीवरील वारुळाचे मनोरे मातीच्या सूक्ष्म कणांचे किंवा रेवेदार वाळूचे बनविलेले असतात व ते वारुळाच्या आतील तापमानाचा समतोल आणि आवश्यक ती आर्द्रता राखण्यास मदत करतात.या बोगदे आणि सज्ज्यांमध्ये
मुंग्यांच्या अनेक पिढ्या एकत्र नांदत असतात.

आपल्या घरात जशा खोल्या असतात तसे वारुळाच्या आत खूप छोटे छोटे कप्पे (chambers)असतात.हे कप्पे बोगद्यांनी जोडलेले असतात.यांचा उपयोग मुंग्यांच्या बाळांसाठी संगोपनगृह,अन्न साठवणुकीचे कोठार,थकलेल्या कामकरी मुंग्यांसाठी विश्रांतीगृह अशा अनेक प्रकारांनी केला जातो.

प्रत्येक कामासाठी वेगळा कप्पा.बाळांची काळजी घेणाऱ्या कामकरी मुंग्या,त्यांना ऋतुमानाप्रमाणे पुरेशी ऊब देण्यासाठी वारुळाच्या उबदार भागात इकडून तिकडे हलवतात.दिवसाच्या वेळी कामकरी मुंग्या संगोपनगृहातील डिंभांना ऊबेसाठी वारुळाच्या मनोऱ्यांजवळील कप्प्यांमध्ये नेतात आणि रात्री त्यांना परत खालच्या बाजूला आणतात.वारुळाच्या आतील बोगदे व सज्जे ह्यांनी व्यापलेला अवकाश आणि विभिन्न आकारांनुसार त्यात सामावलेल्या मुंग्या ह्यांचा विचार केल्यास,उपलब्ध जागेचा त्यांनी इष्टतम ( optimum ) उपयोग केल्याचे लक्षात येते,जो स्थापत्यशास्त्रासाठी एक धडाच आहे .

वारुळांच्या रचनेतून या शास्त्राला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.उदाहरणार्थ, वारुळातील वायुवीजन(ventilation)व्यवस्था विलक्षण कार्यक्षम असते.त्याने वारुळातील अंतर्भाग उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवला जातो.वारुळावर दिसणारे मनोरे हे एक प्रकारे धुराड्याचे कार्य करतात त्यांची पोकळी वारुळाच्या मध्यभागी तीन मीटरपर्यंत खोलवर पोहोचलेली असते.या मध्यवर्ती पोकळीशी वारुळाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर बोगद्यांचे अंतर्गत जाळे जोडलेले असते.वारुळाची अंतर्गत रचना शरीररचनेत खूप भिन्नता आहे.मुंग्या’फोर्मिसिडी’ तर वाळवी ‘टर्मिटॉइडी'(Termitoidae ) कुळातील आहे. प्रत्येक वारुळाची निर्मिती हे कामकरी मुंग्यांच्या अनेक पिढ्यांच्या श्रमाचे फलित असते.प्रत्येक जातीतील मुंग्यांच्या वारुळाची बाह्यरचना आणि आकार भिन्न असतो.तसेच त्यांच्या वाढीची गतीही वेगवेगळी असते.

वारुळाचा जमिनीच्या वरील भाग ३-४ सेंटीमीटर्सपासून ३-४ मीटर्स इतका असू शकतो.अलेघेनी (Allegheny) मुंग्यांच्या वारुळाची शिखरे दरवर्षी १ फूट या गतीने वाढतात.काही वारुळे मऊशार व लहान आकाराची असून रेवेदार वाळूपासून बनलेली असतात तर काही उंच मिनार असलेली वारुळे मातीच्या सूक्ष्म कणांपासून निर्मिली जातात.वेस्टर्न हार्वेस्टर मुंग्यांच्या वारुळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जमिनीवरील भाग बराचसा लहान दिसत असला तरी त्यांचे जमिनीखालील बोगदे,जमिनीच्या पृष्ठभागापासून जवळपास ५ मीटर्स खोल गेलेले असतात .

ब्रिटनमधील गवताळ प्रदेशात निवास करणाऱ्या पीतवर्णीय मुंग्यांची वारुळे जमिनीवर एक मीटर उंच व दोन मीटर व्यासाची असू शकतात.त्यांचे जमिनीवरील आकारमान प्रतिवर्षी सुमारे एक मीटरने वाढते . यावरून आपण वारुळांच्या वयाचा अंदाज बांधू शकतो.बहुतांश वारुळांच्या आत बोगदे आणि सज्जे यांचे अतिशय गुंतागुंतीचे जाळे असते आणि त्यांचे स्वरूप मुंग्यांच्या जातींनुसार बदलते.हे बोगदे व सजे बनविण्याचे काम सहसा रात्री केले जाते.

हे करताना कामकरी मुंग्या जमिनीखाली खणत जातात आणि निघालेली माती जमिनीवर आणून त्यापासून वारुळाचे,मुंग्यांचे पर्यावरणीय महत्त्व मुंग्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बजावत असलेल्या विशिष्ट भूमिकेमुळे त्यांना ‘ परिसंस्था अभियंता म्हणतात.

शुष्क वातावरणात गांडुळांचे अस्तित्व नसते . तिथे जमिनीचा वरचा थर सुपीक राखण्याचे काम गांडुळांच्या दहापट वेगाने मुंग्या व वाळवी ह्याच करतात.मुंग्या हेक्टरी ३३,६५५ किलोग्रॅम माती दरवर्षी नव्याने तयार करतातजमिनीवरील सेंद्रीय पदार्थांचे मृतावशेष कुजविण्याचे काम मुंग्या करतात व त्यात अडकलेली पोषकद्रव्ये मोकळी करतात आणि वनस्पतींना त्यांच्या सुयोग्य वाढीसआवश्यक असलेली पोषकद्रव्ये पुरवितात.जमिनीवर जागोजागी मुंग्यांनी तयार केलेले वारूळसदृश उंचवटे जमिनीवर आच्छादनाचे  काम करून मातीतील ओलावा टिकवून ठेवतात.

मुंग्यांसारख्या लहानग्या जीवाचे आपल्या दैनंदिन व्यवहारात नगण्य अस्तित्व असले तरी ‘अहर्निशं सेवामहे’हे व्रत निष्ठेने सांभाळून एकमेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ’या ब्रीदवाक्याप्रमाणे आपले समाजजीवन त्या ज्याप्रकारे व्यतीत करतात त्यातून आपल्याला त्या जबाबदार नागरिकत्वाची जाणीवच करून देत असतातएक प्रकार असाही आहे,जो इतर वारुळातील मुंग्यांना आपले गुलाम करतो.तसे करण्याच्या पद्धतीही अनेक आहेत व त्यानुसार त्यांच्या प्रजातीही.’बोथरिओमायरमेक्स डिकापिटास ‘ या आफ्रिकेतील मुंग्यांच्या जातीमध्ये राणी मुंगी स्वत : लाच टापीनोमा ‘ प्रजातीच्या मुंग्यांद्वारे कैद करविते त्यांच्या वारुळात शिरताच तेथील राणी मुंगीचे डोके छाटून ती स्वत : च अंडी घालू लागते.त्यांची काळजी एका अर्थी गुलाम झालेल्या टापीनोमा कामकरी मुंग्या घेतात.

प्रोमोग्नॅथस अमेरिकानस ‘ या गुलाम जातीतील मुंग्या ‘ टेम्नोथोरॅक्स ‘जातीच्या वारुळावर धाड घालून त्यातील मुंग्यांचे कोश पळवितात आणि त्यापासून तयार होणाऱ्या कामकरी मुंग्यांना आपले गुलाम बनवितात
डिंभांना ती स्वत : च्या तोंडातील लाळेसारखा पदार्थ भरवते.या डिंभांची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोषावस्था प्राप्त होते .

कोशांतून पुढे कामकरी मुंग्या बाहेर पडतात व बिळाचे तोंड उघडून लगेच आपल्या कामाला लागतात.राणी मुंगी आयुष्यभर अंडी घालणे व वसाहतीमधील मुंग्यांची संख्या झपाट्याने वाढवणे हेच एकमेव कार्य करीत राहते.नवी वसाहत तयार होताना एकापेक्षा जास्त राणी मुंग्या त्यात असू शकतात.परंतु वसाहतीची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यात सामान्यपणे एकच राणी मुंगी कार्यरत असते.वसाहतीचा आकार त्यातील मुंग्यांच्या संख्येवरून ठरतो व तो काही शे मुंग्यांपासून अगदी काही कोटी मुंग्यांपर्यंत असू शकतो.हा आकार मुंग्यांच्या विविध जातींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ,मुंग्यांच्या फोर्मिका फुसका

या जातीच्या वसाहतीची संख्या केवळ ५०० कामकरी मुंग्या एवढीच असते , तर फोर्मिका येसेन्सिस या जातीत ती ३०.६ कोटी एवढी प्रचंड असते.शिवाय एकाच वसाहतीत ऋतुमानाप्रमाणेही मुंग्यांच्या संख्येत बदल होतो.मुंग्यांच्या खाद्य मिळविण्याच्या,आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्याच्या आणि समागम करण्याच्या पद्धती,मुंग्यांचे दृश्य स्वरूप तसेच त्यांचे वसाहतीतील साहचर्य हे बरेचसे त्यांच्या वसाहतीच्या आकारावरून ठरते.या वसाहतींच्या विशाल आकारामुळे त्यांची तुलना आपल्या महानगरांशीच होऊ शकेल.

मुंग्यांच्या काही वसाहती या महाकाय असतात . मोठ्या क्षेत्रावर पसरलेल्या अनेक वसाहती मिळून एक महावसाहत तयार होते .यातील प्रत्येक घटक वसाहतीमधील मुंग्या त्यांची जनुकीय वैशिष्ट्ये ध्यानात ठेवून आपापसातच समागम करीत असल्या , तरी दुसऱ्या वसाहतीमधील मुंग्यांसोबत त्या साहचर्याने नांदतात.वारुळाचे विविध उपयोग केले जात आहेत.

वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते , तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी , शेतीतील उत्पादनवाढीसाठी आणि घरबांधणीसाठी उपयोग होतो वाळवीच्या वारुळांचाही असाच उपयोग होतो आपल्याकडे थोर खगोलशास्त्र व गणितज्ञ वराहमिहिरांनी वारुळे ( विशेषतः वाळवीची ) आणि त्यांच्या आसपास वाढलेल्या वनस्पती यांचा अभ्यास करून जमिनीतील भूजलाची शक्यता आजमावली आहे .

नैसर्गिकरीत्या वाढलेले वड , जांभूळ , औदुंबर , पांढरा शमी सिंदीचे झाड आणि जवळपासच्या वारुळांची संख्या , तसेच त्यांची दिशा हे जमिनीखालील कालनिर्णय पोषकद्रव्यांचे प्रमाणही बरेच आढळले आहे . वारुळाच्या जमिनीवरील भागापेक्षा जमिनींच्या आतील भागातील मातीमध्ये या सर्व पोषकद्रव्यांची मात्रा जास्त आढळून आली त्यामुळे मुंग्या किंवा वाळवी यांनी टाकून दिलेल्या ओसाड वारुळांचे मोल शेतकऱ्यांसाठी विशेषच आहे.

संदर्भ लेखन स्त्रोत:- डॉ.तारक काटे

महत्वाच्या बातम्या : –

नागपुरात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

गोमुत्र हे मानवी शरीरासाठी जितके चांगले तितकेच शेतीसाठीही महत्वाचे

आंबा मोहोर संरक्षण

मिरची वरील मर रोगावर उपाय

जायद हंगामात भेंडीची लागवड करण्याची पद्धत

Leave a comment