आंदोलन कमी व जत्रा जास्त; भाजप प्रवक्त्यांची टीका

0

कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. केंद्र सरकारशी अनेकदा चर्चा करून देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली असल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे.

भाजप नेते अवधूत वाघ यांनी या आंदोलनाचा उल्लेख जत्रा असा करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

‘नोटाबंदी,GST, NRC, CAA, 370, 35A, सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा,राफेल आदी साऱ्या बाबतीत मोदीजींना प्रखर विरोध करुन परत परत तोंडावर आपटणाऱ्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्ष आणि शेतकरी आंदोलनावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा चर्चा झाल्यात. मात्र, ठोस तोडगा निघू शकलेला नाही. आता सरकारने चर्चा करण्यासाठी पुन्हा तयारी दर्शवली आहे. याविषयी शेतकरी नेते निर्णय घेणार आहेत. चर्चेसाठी पुढील तारखेसंदर्भात केंद्राच्या पत्रात काही नवीन नाही, असे देखील शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.

इतके म्हणतानाच पुढे इंग्रजीत त्यांनी जोडले आहे की, हे आंदोलन आणि तिथले ठिकाण म्हणजे फ़क़्त पोलिटिकल टुरिझम आहे. एकूणच वाघ यांनीही त्यांच्या काहीही बोलण्याच्या स्टाईलने आंदोलकांवर टीका केली आहे.

Leave a comment