जाणून घ्या जास्त कांदा खाण्याचे दुष्परिणाम

0

कांदा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याकारणाने कांद्याला सुपर फूड देखील म्हटले जाते हे तर तुम्हाला माहितीच आहे. जेवणाला स्वाद आणण्यासाठी कांदा हा अत्यंत उपयुक्त आहे. स्वयंपाक घरात कांदा हा सर्व्यात महत्त्वाचा घटक आहे.

अनेकांना कांद्याचे फायदे माहित आहेत परंतु त्याच्या नुकसानाविषयी फारच कमी लोकांना माहित आहे. असे फारच कमी लोक आहेत ज्यांना कांद्याचे नुकसान माहिती आहेत. जास्त प्रमाणात कांदा खाल्ला तर शरीराला त्याची नुकसान होते. तर मग जाणून घेऊया जास्त कांदा खाल्ल्याने काय नुकसान होते.

कांद्यामध्ये एंटीऑक्सीडेंट, विटामिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असते. हे शरीरासाठी फारच फायदेशीर आहे. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याच्यापासून काही नुकसान होते. आयुर्वेदामध्ये कमीत कमी प्रमाणात कांद्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जास्त प्रमाणात खांदा सेवन केल्याने व्यक्तीचे लक्ष विचलित होते.

पोटदुखीचे कारण – जास्त प्रमाणात कांदा सेवन केला तर पोटदुखीच्या समस्या उद्भवतात. कारण जास्त कांदा खाल्ल्याने शरीरात फायबरची मात्रा वाढते. त्यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होते.

पोटाविषयी समस्या – कांद्यामध्ये नॅचरल फ्रुकटोज जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गॅस समस्या उत्पन्न होते. त्यामुळे जास्त प्रमाणात कांदा सेवन करू नये.

तोंडाचा वास येणे – कच्च्या कांद्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंडाचा वास येऊ लागतो.

कांद्याची आरोग्य विषयक फायदे

कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. पचनाची क्रिया सामान्य होते. सर्दी आणि खोकला या आजारांवर कांदा उपयुक्त आहे.

Leave a comment