जाणून घ्या थंडीच्या दिवसात तीळ खाण्याचे गुणकारी फायदे

0

हिवाळा स्वास्थासाठी चांगला ऋतू मानला जातो. थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत.

थंडीत तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते.  तिळाचं सेवन आरोग्यासह, सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. आयुर्वेदानुसार, तिळाचं सेवन करणं शक्तिवर्धक आणि प्रभावी आहे. तिळाचे दोन प्रकार असतात. एक सफेद तीळ आणि दुसरे काळे तीळ. जगभरात तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.

– तिळाच्या तेलाने सतत मालिश केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.

– तिळात सेसमीन नावाचे एन्टीऑक्सिडेन्ट आढळतात जे कॅन्सर पेशी वाढण्यापासून बचाव करतात.

– थंडीच्या दिवसांत तिळाचं तेल त्वचेवर लावल्याने त्वचेवरील रखरखीतपणा दूर होतो. तिळाच्या सेवनाने चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

– वैज्ञानिकदृष्ट्या तिळाच्या तेलामध्ये केसांसाठी पोषक घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनही मूबलक प्रमाणात आढळतं.

– तिळाच्या सेवनामुळे भूक वाढते. तीळ वात, पित्त आणि कफची समस्या कमी करण्यास मदत करते.

 

 

Leave a comment