द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाण आढळून येते. त्यामुळे उन्हाळ्यात द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक आहे. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व आढळून येतात जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. आज आपण उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात द्राक्ष खाल्यामुळे आपले रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना अत्यंत फायदेचे ठरणार. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्या. असे केल्यास रक्ताची कमतरता दूर होते.
कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात द्राक्ष खाणे फार लाभदायक आहे. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा.
द्राक्ष खाल्यास रक्तातील नायट्रिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते.