जाणून घ्या ‘खजूर’ खाण्याचे ५ फायदे
खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला अनेक फायदे देखील आहेत. खजूरमध्ये विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतात. खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
जर तुम्ही रोज सकाळी पाण्यात भिजवलेले खजूर खात असाल तर तुमचे पचन सुधारण्यास मदत करतील. खजूर तुमचे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही खजूर तुपासोबत खाऊ शकता.कफाचा आजार असलेल्यांसाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर खाणं हे शरीरातील वायु, कफ आणि पित्ताचं प्रमाण पाहून ठरवावं.
रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात. खजूर हा संधिवातावर गुणकारी आहे. खजूरमध्ये असलेले मॅंगनीज, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम सारखे घटक आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहेत.
खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे.
खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात.