झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो जाणून घ्या

0

बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया :

१ ) वातावरणात बुरशीचे बीजाणू ( स्पोअर्स ) असतातच . हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात . ही फक्त एक सुरुवात असते .

२ ) पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते , ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात . परिणामी , जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही .

३ ) यानंतर बुरशीची वाढ सुरू होते . सर्वप्रथम हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात . बियांपासून जसे अंकुर फुटतात तशाच पध्दतीने बुरशीच्या बीजाणू पासून बुरशीचा जन्म होतो . या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते . ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यांसारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात . हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल . यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते .

४ ) त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागांत प्रवेश करून हल्ला करतात . एखादी जखम किंवा पर्णछिद्रे यामधून देखील ते तंतू प्रवेश करतात . यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते . यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो .

५ ) यानंतर हीच बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि हे बीजाणू पानाच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात . हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडून नवीन झाडांवर हल्ला करतात .

हे चक्र असेच सुरू राहते . म्हणून , आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे याचा विचार करून स्पर्शजन्य की आंतरप्रवाही यापैकी कोणते ( किंवा दोन्हीही ) बुरशीनाशक वापरावे हे ठरवावे . हा विचार करून काम केल्यास आपले काम अतिशय प्रभावी होईल व अनावश्यक स्प्रे चे पैसेही वाचतील .

महत्वाच्या बातम्या : –

पंतप्रधान शेतकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत – जयंत पाटील

करवंद लागवड पद्धत

शतावरीच्या लागवडीपासून कमवा अधिक नफा

गहू पिकामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी जाणून घ्या

आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात ‘हे’ फायदे

Leave a comment