जाणून घ्या चांगले कुजलेले सेंद्रीय खतबद्दल संपूर्ण माहिती

0

असे नेहमी सांगितले जाते. सर्वांना एक गोष्ट पक्की माहित आहे की बिन कुजलेले खत टाकल्यास त्यात विविध प्रकारच्या तणांच्या बिया असतात. त्या शेतात उगवतात आणि खताचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते.

न कुजलेल्या वनस्पतीजन्य सेंद्रिय पदार्थांत कार्बन नायट्रोजनचे प्रमाण सुमारे ४:१ असे असते.

हे कच्चे खत शेतात टाकल्यावर कुजण्याची क्रिया सुरू होते. कार्बन जास्त म्हणून जिवाणूंची वाढ जास्त होते.

एवढ्या जिवाणूंना नत्र कमी पडतो. मग मातीतले नत्र हे जिवाणू जबरदस्तीने घेतात. झाडाच्या मुळ्या मधून सुद्धा नत्र ओढले जाते.

परिणामी झाड वाळते. दुसरा परिणाम म्हणजे जिवाणू झपाट्याने वाढल्यामुळे उष्णता निर्माण होते.

झाडाची मुळे तापल्यावर त्यांचा ऑसमॉटिक दाब कमी होतो त्यामुळे मुळे अन्न पाणी शोषण करू शकत नाहीत व झाड वाळते.

काही कीटक सेंद्रिय पदार्थावर जगतात. खायला मिळाले तिथे त्यांची संख्या वाढते.

जिवाणूंपेक्षा किटक जास्त सेंद्रिय पदार्थ खातात.

सेंद्रिय पदार्थ संपल्यावर ते उभ्या पिकावर हल्ला करून मोठे नुकसान करतात.उंदीर, घुशी, खारी, सेंद्रीय पदार्थ खातात. वाळवी, मुंग्या, मुंगळे, गोगलगाई असेही प्राणी सेंद्रिय पदार्थ फस्त करतात व नंतर पिकाच्या मुळांवर हल्ला करुन नुकसान करतात.

आणखी एक धोका असा की सेंद्रिय पदार्थ कुजताना काही टॉक्झीन्स (विषारी द्रव्ये) तयार होतात.

ही द्रव्ये पिकांनी शोषल्यास पीक मरते.

कुजलेले सेंद्रीयखत टाका असे म्हणण्याला किती गंभीर अर्थ आहे हे वाचकांना कळले असेल.

नत्र कमी पडू नये म्हणून युरिया टाकावा का? नाही! कारण कोणतेही नत्रयुक्त खत टाकल्याने जीवाणू अधिकच वेगाने वाढतात व जमीन तापते.

सेंद्रिय पदार्थाचे बारीक तुकडे केले तर कुजण्याची क्रिया लवकर होते.

१८ अंश सेल्सिअस खाली तापमान गेल्यास कुजण्याची क्रिया मंदावते व १० अंश सेल्सिअस खाली ती पूर्ण थांबते.

कमाल तापमानाची मर्यादा ३८ अंश सेल्सिअस आहे. सामू पाच ते आठ या मर्यादेत असावा.

आर्द्रता पदार्थांच्या वजनाच्या ९० ते १०० टक्के असावी. जास्त ओलाव्यात हवेष्णू जिवाणू निष्क्रिय होतात.

वरील कारणांचा नीट अभ्यास करून अशी स्थिती सांभाळल्यास सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया सुलभ होते.
सेंद्रिय खतांचा सध्या प्रचंड तुटवडा आहे.

एका अंदाजानुसार महाराष्ट्रात ४० हजार कारखाने उभारले तरी सेंद्रिय खत कमीच पडेल.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

महत्वाच्या बातम्या : –

ई-नाम योजनेंतर्गत आणखी १००० नवीन मंडी सुरू करण्यात येणार , शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार

कृष्णा फळाच्या लागवडीतून विनोद पाटीदार कमवत आहे मोठा नफा

सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डवर, आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

‘या’ ठिकाणी पिकतेय जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत तब्बल 82 हजार रुपये

पाने पिवळी पडतात त्यावर उपाय

Leave a comment