मिरचीच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

0

1] तेजस्विनी
2] तेजाफोर
3] राशी
4] अग्निरेखा
5] फुले ज्योती
6] ब्याडगी
7] ज्वाला
8] पंत सी-1
9] फुले सई
10] संकेश्वरी

मिरचीच्या जातीची विविध प्रकारानुसार माहिती

1. तेजस्विनी मिरची = हि एक तिखट मिरची ची जातं आहे. हि जातं कोणत्याही शेत जमिनीत येते. बाजारात या मिरची ला योग्य भाव मिळतो.
एकरी उत्पन्न- 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
मर रोग व थ्रिप्स कमी प्रमाणात येते.
जमिनी नुसार खतांचा वापर करावा.

2. तेजाफोर मिरची = हि जातं काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते.
तोडा करण्यास उपयुक्त ठरते. बाजारभाव चांगला मिळतो.
एकेरी उत्पन्न 10 ते 12 क्विंटल प्रती एकर
थ्रिप्स व हिरवा तुडतुडा रोखण्यास प्रतिकार करते.

3. राशी मिरची = हि जातं काळ्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत येते. उपयुक्त व मध्यम तिखट, तोडा करण्यास अतिशय सोपी.
एकेरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल प्रती एकर
खतांचा वापर करताना सिंचन द्वारे द्यावे. ह्युमिक ऑसिड, 19:19:19 असे खते वापरावी.

4.अग्निरेखा मिरची = हिरवी मिरची तोडण्यास उपयुक्त ठरते.
एकेरी उत्पन्न 8ते 10 क्विंटल प्रती एकर
भुरी आणि मर रोग यांवर प्रतिकार करते.

5. फुले ज्योती मिरची = मसाला पावडर बनवण्यासाठी हि मिरची जास्त वापरली जाते.
वाळेल मिरची चे एकेरी उत्पन्न 10ते 12 क्विंटल प्रती एकर
भुरी रोग कमी प्रमाणात पडतो, फुलं किडे व पांढरी माशीला प्रतिकार करते.

6. ब्याडगी मिरची = लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. दीर्घ काळ साठवून ठेवता येते, रंग फिकट होतं नाही. मिरची वर सुरकुट्या जास्त असतात. मिरची ची साल जाड राहते. त्यामुळे वजन जास्त राहते.

7. ज्वाला मिरची = लागवडी साठी योग्यजातं आहे.
तिखटपणा जास्त आहे.

8. पंत सी-1मिरची = हिरव्या व लाल मिरची साठी हि जातं वापरली जाते. तिखटपणा जास्त आहे.

9. फुले सई मिरची = या मिरची ला वाळलेल्या नंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे.

10. संकेश्वरी-32 मिरची = या मिरची ची लागवड मुख्यतः लाल मिरची च्या उत्पादनासाठी केले जाते. तिचा रंग लाल व आकर्षक असतो. तिखट मध्यम आहे.
हि जातं प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीत लावली जाते.

महत्वाच्या बातम्या : –

उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादनाकरिता काही प्रमुख सूत्रे

झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो जाणून घ्या

पंतप्रधान शेतकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहेत – जयंत पाटील

करवंद लागवड पद्धत

शतावरीच्या लागवडीपासून कमवा अधिक नफा

Leave a comment