द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता

0

सांगलीमध्ये आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री आता सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे.

वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात. जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते.

गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरु झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या औषधी वेल कलिहारीची लागवड कशी करावी

जनधन योजनेंतर्गत ४१ कोटीहून अधिक लोकांनी या खात्याचा घेतला लाभ

पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम; दोन्ही बाजूंमध्ये आज पुन्हा होणार चर्चा

Leave a comment