शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर म्हणाल्या….

0

कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या कायद्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे आंदोलन आता चिघळताना दिसून येत आहे. त्यातच आता परदेशी कलाकारांनी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र, परदेशी कलाकारांनी दिलेल्या पाठिंब्याला भारतातील कलाकारांनी विरोध केला आहे. हा आमच्या देशातील अंतर्गत वाद असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यातच आता लता मंगेशकर यांनी देखील शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

लता मंगेशकर यांनी एक ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ‘भारत एक महान देश असून आपण सगळेच भारतीय यामुळे गौरवान्वित आहोत. त्यामुळे एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो किंवा समस्या असो एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा असो लोकांचे हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीने तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद’, असं म्हणत त्यांनी ट्विटमध्ये #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅगही दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

‘हे हिटलरचे सरकार आहे’ – प्रकाश आंबेडकर

चिराटा प्लांटचे फायदे आणि तोटे, नक्कीच वाचा

आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ

बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं कठीण

Leave a comment