साठ हजार जनावरांना ‘लंम्पी’चा प्रादुर्भाव

0

नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यापासून गाय आणि म्हैस अश्या जनावरांना ‘लंम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. सोळा तालुक्यांतील एक हजार २३२ गावांत ५९ हजार ५७५ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर लसीकरण करण्यात आले. सध्या हा आजार नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने दिली आहे.

पशुपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. लंम्पीचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना विलगीकरण करण्यासह गोचीडाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात तसेच गोठ्यात फवारणी करण्यात आली. लसीकरणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याने आजार आटोक्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. घुले यांनी दिली आहे.

ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील एक हजार २३२ गावांतील जनावरांच्यामध्ये ‘लंम्पी स्कीन डिसीज’ आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. यात गाय वर्गातील जनावरांची मोठी संख्या होती. म्हैस वर्गातील जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होता. जिल्ह्यात ५९ हजार ७५७ जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यासाठी ९८ हजार ७०० गोटपॉक्स लस मिळाली होती. पशुसंवर्धन विभागाने ८५ हजार ३९० जनावरांना लसीकरण केले.

जिल्ह्यात कोरोनाच्या काळामध्ये जनावरांनाच्या अंगावर गाठी येऊन त्यातून रक्तस्राव होत असल्याचा प्रकार आढळून आला. हा आजार एका जनावराला झाल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर जनावरांनाही त्याचा प्रादुर्भाव होतो.  महागडा उपचार करूनही आजार नियंत्रणात येत नसल्याने पशुपालक हैराण झाले होते.

यामुळे हा आजार सध्या आटोक्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. घुले यांनी सांगितले. सध्या लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून सर्व जनावरे आजारमुक्त झाली आहेत. सध्या जनावरांना नव्याने हा आजार आढळून आला नाही.

 

Leave a comment