कृषी कायद्यावर चर्चेसाठी जावडेकरांचे राहुल गांधींना खुले आव्हान
कृषी कायद्यावरून देशातील राजकारण तापले असून, विरोधी पक्षांकडून देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी दोनदा राष्ट्रपतींची भेट घेतली. आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींना थेट कृषी कायद्यावर चर्चेसाठी जाहीर आवाहन दिले आहे.
राहुल गांधी कधी तरी लोकांसमोर येतात. ते नवे कृषी कायदे रद्द करा. कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की नाही यावर चर्चा करावी, असे खुले आव्हानच जावडेकर यांनी राहुल गांधींना दिले आहे. कृषी कायद्यावर चर्चेसाठी मी राहुल गांधी आणि डीएमकेला आव्हान देत आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.
राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील जावडेकर यांनी केला आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे. जसे काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असं चित्र रंगवले जात आहे, असे जावडेकर म्हणाले