रॅली संपायला तीन दिवस देखील लागू शकतात
दिल्लीच्या तीन सीमेवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघत आहे. त्यात टीकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. जवळपास ३७० कि.मी. ही रॅली असेल. यात कवायतीपासून देशप्रेमावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील. त्यासाठी तीन दिवस देखील लागू शकतात असे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा म्हणून दिल्लीतील सहा सीमा अडवल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका होऊनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली .
टीकरी सीमेहून ११० कि.मी. तर सिंघू सीमेहून ९० कि.मी. रॅली काढली जाणार आहे. गाझीपूर सीमेवरून निघणाऱ्या रॅलीचा परिघ हा जवळपास ७० कि.मी. असेल. पलवलचे शेतकरी टीकरी सीमेवर जातील तर शहाजापूरचे शेतकरी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत.
रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी सावधानता बाळगली जाणार आहे. ही रॅली संपायला तीन दिवस लागू शकतात, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या : –
… म्हणून राज्यपाल शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत, राजभवनाचे स्पष्टीकरण
राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही – शरद पवार
मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप
गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक
गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, अबू आझमी यांचे वक्तव्य