‘माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवारसाहेबांनी दखल घेणं हे भाग्यचं’, पवारांच्या टीकेला दरेकरांचे उत्तर

0

आझाद मैदानावरील आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दरेकरांवर निशाणा साधत एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे म्हटले होते.

शरद पवारांची ही टीका दरेकरांना चांगलीच लागल्याचे दिसत असून, पवारांच्या टीकेला दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं,हे माझं स्वतःचं भाग्य समजतो.वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं,परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केले आहे, असे दरेकर म्हणाले. सोबतच, येणाऱ्या काळात माझ्या कामाचा त्यांना अभिमान वाटेल असे काम करेल. भेंडी बाजारचा, मुस्लिम, सेक्यूलर हा विषय आल्याने पवारसाहेबांनी असे वक्तव्य केले असावे, असे ते म्हणाले.

दरेकर म्हणाले की, मी आधार असलेले वक्तव्य केले आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही. विधानपरिषदेवर यापूर्वी मोठे नेते गेले आहेत, याचे मला भान आहे. मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी मी एका मुस्लिम भगिनीला विचारले असता तिने भेंडी बाजार सांगितले. भेंडी बाजारातून कोठून शेतकरी आला ? असा सवाल त्यांनी केला.

स्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का? शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. शाहीन बागमध्ये जे लोक फिरत होते, त्यातील काहीजण आझाद मैदानाच्या आजुबाजूला फिरताना पाहिले. केंद्रात जे आंदोलन पेटत आहे, ते असे करू शकत नाही, या आंदोलनामागे देशविघातक लोक आहेत, असे दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : –

‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’

‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’

ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसले

बटाटा पिकावरील रोग व व्यवस्थापन

फळाचे सालही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात

Leave a comment