अहमदनगरमध्ये कांद्याला मिळाला 3000 ते 3400 रुपये भाव
अहमदनगरमधील कांद्याला अनेक भागातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते पण शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
कधी चांगला भाव मिळाला तर शेतकरी आनंद होतो पण बऱ्याच वेळा कांद्याला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडतो सध्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केट मध्ये कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
का़द्याला जास्तीत जास्त 3400 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे बोलेल जात आहे.काल म्हणजेच 20 जानेवारी 2021 रोजी कांद्याची 43 हजार 310 गोण्या आवक झाली. काल चांगल्या कांद्याला 3000 ते 3400 रुपये दर मिळाला तर थोड्या छोट्या कांदयाला 2800 ते 3000 रुपये दर मिळाला तर गोल्टी कांद्याला 2700 ते 3100 शंभर रुपये तर तीन नंबरच्या खांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला अशी माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या भावामुळे शेतकरी कुठेतरी समाधान दिसत होते. कांद्याचा दर यापुढील काळात वाढत राहिला तर निश्चितच कांद्याला चांगले पैसे मिळून एक समाधानाचे वातावरण तयार होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या : –
उन्हाळी मुगाचे उत्पादन तंत्रज्ञान
महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध
कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध