शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

गेल्या २४ तासात सिंदी (रेल्वे), कारंजा तसेच आर्वी परिसरात वादळी वाऱ्यासह  जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे बोलेल जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

वादळी वारा सुटताच आर्वी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

या अचानक झाललेया पावसामुळे कारंजा भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य या पावसाच्या पाण्याने भिजले आहेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच पाच घरांवरील टिनपत्रे उडाली.

एकूणच उन्हाळी भुईमूग, रबी तसेच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सिंदी (रेल्वे) परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू व चणा भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

वादळी वाऱ्यासह गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण कृषीसह महसूल विभागाकडून केले जात आहे. सर्वेक्षण तसेच पंचनाम्यांअंती नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या : –

सर्दी-खोकल्यापासून, वजन कमी करण्यापर्यंत करवंद खाण्याचे असंख्य फायदे….

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकांचं मोठं नुकसान

कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता

उत्तराखंडनंतर आता ‘या’ राज्यात गांजाची लागवड वैध होऊ शकते, वाचा सविस्तर

Leave a comment