ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय,शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

0

कृषी कायद्यावरून एकीकडे दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या वेळी घेतला. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, संचालक सतीश सोनी आदी बैठकीला उपस्थित होते.

आता राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ मिळू शकणार आहे.खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी, अशी सूचना देखील देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : –

कार्ली व दोडका लागवड मार्गदर्शन

कांदा पिक मार्गदर्शन

निमेटोड व मर रोगाचे नियंत्रण

शेतीत वापरले जाणारे औषध किती प्रमाणात विषारी आहे ते अश्या प्रकारे ओळखा

जाणून घ्या पिस्ता खाण्याचे गुणकारी फायदे

 

Leave a comment