शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नाही आले तर करा ‘या’ मोबाईल क्रमांकावर तक्रार

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर २०२० रोजी देशातील 9 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत त्यांच्या खात्यात जमा केले. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही झाले.

परंतु अजून पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुमची खात्याची स्टेटस तुम्ही तपासू शकता. तुम्हाला https://pmkisan.gov. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या बद्धल माहिती घेऊ शकता.

या वेबसाईटवर पेजच्या उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर चा पर्याय दिसेल. या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून नवीन पेज ओपन होईल. ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता. आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ट्रांजेक्शन विषयी अधिक माहिती मिळते.

जर तुम्हाला पयमेंत कन्फर्मेशन इस पेंडिंग असा संदेश तिथे दिसल तर समजायचे की ट्रान्सफर ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहे म्हणून.

पंतप्रधान किसान योजना फॉर्म २०२० सुधारित करण्याची प्रक्रिया-

– प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– आपल्या स्क्रीनवर एक वेब पेज दिसून येईल.
– मेनू बारवरील किसान शेतकरी टॅबवर क्लिक करा.
– ड्रॉप डाऊन सूचीतील शेतकरी तपशील संपादित करा पर्यायावर क्लिक करा. आपला आधार क्रमांक आणि     संबंधित फील्डमध्ये कॅप्चा कोड नमूद करा.
– शोध बटणावर क्लिक करा. पुढील माहिती अपडेट करा.

कोणत्या नंबरवर तक्रार करावी?

जर तुमची नाव मागच्या वेळेस लिस्टमध्ये होते. परंतु नवीन लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर तक्रार दाखल करू शकतात.

हेल्पलाइन नंबर -011-24300606

मंत्रालय संपर्क क्रमांक

पी एम किसान टोल फ्री नंबर-18001155266

पी एम किसान हेल्पलाइन नंबर-155261

पी एम किसान लँडलाईन नंबर-01123381092, 23382401

महत्वाच्या बातम्या : –

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण

जाणून घ्या जास्त कांदा खाण्याचे दुष्परिणाम

 

Leave a comment