चारा खातांना गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी करा ‘हा’ उपाय
पोट न फाडता गाईच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचा जालीम उपाय शोधला आहे डॉ. कैलाश मोडे यांनी.हे जयपूरमधे नगर निगम कार्यालयात पशुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चला तर जाणून घेऊया जर चारा खातांना चुकून गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी तिचे पोट फाडता कसे उपचार करायचे तर…
उपचार पुढील प्रमाणे करावा
सामुग्री
100 ग्रॅम मोहरी तेल 100 ग्रॅम तिळ
100 ग्रॅम लिंबोळी (कडूलिंब)तेल
100 ग्रॅम एरंडेल तेल
कृती
– वरील सगळी तेलं एकत्र करा
– 500 ग्रॅम गाईच्या दुधापासून केलेल्या ताकात घालून चांगले मिसळावे.किंवा 50 ग्रॅम तुरटी,
– 50 ग्रॅम सैंधव मीठ बारीक करून त्यात 25 ग्रॅम सबंध मोहरी टाकावी. हे द्रावण 2-3 दिवस पाजावे आणि चारा खाऊ घालावा.
असे केल्याने प्लास्टिक बाहेर येते. थोड्याच दिवसात सगळे प्लास्टिक बाहेर पडते आणि हा उपाय यशस्वी झाला आहे. आजही आपल्या देशात हजारो गायी प्लास्टिक खाल्यामुळे मरतायत. आपण हा उपाय सगळ्यांना सांगून गोमातेचे प्राण वाचवू या.
महत्वाच्या बातम्या : –
‘शेतकरी विरोधी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरुच राहणार’
कृषी कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणतात…..
मी दिल्लीत आंदोलन करणारच – अण्णा हजारे
शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचा आव आणून सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षा भंग केला – राजू शेट्टी
न्यायालयाने शेतकरी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील