जाणून घ्या कडीपत्त्याचे औषधी उपयोग
औषधी उपयोग : नित्य स्वयंपाकात स्वादवर्धनासाठी कोनिजीन ग्लुकोसाइड नावाच्या घटकामुळे कढीपत्त्याला विशिष्ट स्वाद प्राप्त होतो.
◆कढीपत्त्यात कॅल्शिअम, अ, ब, क जीवनसत्त्वे, प्रथिने, लोह, फॉस्फरस, तसेच आयोडिनचे प्रमाण अधिक असते.
◆पोटांच्या विकारांपासून मुक्तता मिळते. पचन क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. पोटात मुरडा येणे, कळ येउन शौचाला जाणे या समस्यांमध्ये पाने उपयुक्त ठरतात.
◆बलवर्धक, वायूनाशक, रुची उत्तम करणारा, कृमीनाशक डोकेदुखी, तोंड येण्यावर मात करता येते.
◆पानांची चटणी करुन ताकात पूड करून घेतल्यास केसांच्या मुळांना पोषक ठरते.
◆केस निरोगी व काळे राहतात.
◆दररोज चावून खाल्याने लठ्ठपणा कमी होतो.
◆पाने, लिंबाचा रस आणि साखर मिसळून सेवन केल्यास उलट्या थांबतात.
◆यकृत आणि मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायद्याचा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी
◆कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
◆नियमित सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
◆सूज व त्वचाविकारांवर गुणकारी.
◆मधमाशा, डासाचा चावा, खाज यावर पाने वाटून लेप केल्यास बरे वाटते.
◆कढीपत्त्याचे मूळही औषधी.
महत्वाच्या बातम्या : –
आरोग्याचे रहस्य भाज्यांच्या रंगात लपलेले आहे, आपण कोणती रंगाची भाजी खावी हे जाणून घ्या?
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, होईल ‘भरघोस’ फायदा