रुटस्टॉक बागेची छाटणी कशी करावी?

0

1. छाटणी काडीच्या पक्वतेनुसार आणि डोळे तपासणी अहवालानुसार करावी. छाटणी करावयाच्या काडीचे निरीक्षण केल्यास काडीच्या तळापासून दोन डोळ्यांतील अंतर वाढत जाऊन ७ ८ किंवा ९ व्या डोळ्यावर कमी होते. असे आखूड पेर सोडून पुढच्या पेरावर छाटणी करावी.

2. छाटणी करावयाचे असे आखूड पेर साधारणपणे रुटस्टॉकवर भरलेल्या गणेश जातीत ८ ते ९ व्या डोळ्यावर मिळतात तर रुटस्टॉकवर भरलेल्या थॉमसन सीडलेस या जातीत ७ ते ८ व्या डोळ्यावर मिळतात.

3. काडीचा आखूड पेरा सोडून पुढच्या पेरावर छाटणी केल्यास आखूड पेरातून घडाची फूट हमखास मिळते. द्राक्षकाडीवरील डोळयांचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की ५ ते ८ व्या डोळ्यानंतरच्या डोळ्यातून निघणाऱ्या घडाला आकार लहान होत जातो. म्हणून समान आकाराचे डोळे मोठे घड मिळविण्यासाठी काड्यांची छाटणी ६ ते ७ डोळे राखून करावी.

4. रुटस्टॉकची सबकेन केलेली असेल तर छाटणी पहिल्या किंवा दुसऱ्या डोळ्यांवर करावी. सबकेनच्या पहिल्या दोन डोळ्यांतील अंतर दीड ते दोन सें.मी.पेक्षा कमी असल्यास सबकेनची छाटणी दुसऱ्या डोळ्यांवर करावी.

5. रुटस्टॉकच्या वेलीवर काही काड्या अती जाड असल्यास अशा काड्यांना वाक देऊन अथवा पिरंगळून छाटणी करावी. छाटणी करताना काड्यांवर पानांचे देठ किंवा बगलफुटीचे चिपडे पुसून घ्यावेत. म्हणजे मुख्य डोळा फुटण्यास अडचण येत नाही. छाटणी व्यवस्थापनाच्या सोयीनुसार २ ते ३ टप्प्यात करावीत.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर म्हणाल्या….

‘हे हिटलरचे सरकार आहे’ – प्रकाश आंबेडकर

चिराटा प्लांटचे फायदे आणि तोटे, नक्कीच वाचा

आंदोलन दरम्यान मृत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही – नरेंद्रसिंह तोमर

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ

Leave a comment