खोडकीड कीडीचा प्रादुर्भाव कसा होतो व त्यावरील काही उपाय

0

१ )जीवनक्रम – 

प्रथम आपण खोडकिडीचा जिवण क्रम समजुन घेऊ .पतंग दिवसा पाणाच्या मागे . खोडावर .पाचटावर लपुन बसतात . रात्री नर मादीचे मिलन होते .व नंतर मादी अंडी घालु लागते . अंडी घालन्याचे प्रमाण पण खुप म्हणजे पुंजक्याने असते .ऊसाच्या पाणाच्या मागे किंवा देठाच्या बाजुला अंडी घालत असते .१ मादी ५ ते ६ दिवस अंडी घालत असते तिच प्रमान कमीत कमी ५०० ते १००० अंडी घालायचे आहे . प्रथम ही अंडी डोळ्यांनी पण दिसत नसतात एवढी सुक्ष्म असतात ५ दिवसानंतर दिसु लागतात.नंतर अळी अवस्था चालु असते . हीच ऊसाचा मातृेकोंब  आणि फुटव्यामधला मातृकोंब खात असते . अंदाजे १५ दिवसामध्ये ह्या अळ्या पुर्ण प्रौढ अवस्थेमध्ये येतात . त्यानंतर ही अळी ऊसाच्या खोडाला  लहान छीद्र पाडुन आत प्रवेश करते व स्वताच्या विष्टेने ते छिद्र बंद करते . वेळीच उपाय नाही केला तर आतील सर्व कोंब महीन्या भरात खाऊन ५०ते ८० % नुकसान करू शकते .

 २ ) कीडीचा प्रादुर्भाव – 

खोडकिडीचा प्रादुर्भाव हा हलकी जमीण . कमी पाणी . ज्यास्त तापमान . दाट लागण असेल अशा ठिकाणी ज्यास्त दिसुन येतो .

 ३ ) उपाय –

कांदा . लसुन . पालक . या सारख्या अंतर पिकाणी याचा प्रादुर्भाव कमी करता येतो .

पण मका अंतर पिक असेल तर खोडकिड वाढु शकते .

प्रति एकर १० फेरोमोन सापळे लावल्यास नर अडकुन पडतो व पुढचे प्रजनन टाळता येते ..

 ४ )  जैविक व सेंद्रिय उपाय : 

खोड किडीवर बिव्हेरिया बॅसियाना व मेटाराईझमचा स्प्रे पतंग व अंडी अवस्थेत असतांना घ्यावा त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळते.

आळी नाशक बाजरीच्या पिठापासून बनविलेले वापरावे.

हिरवी मिरची 2 kg , लसुण 2 kg , तंबाखू 2 kg

20 लिटर गोमूत्रात टाकून उकळून घ्यावे

द्रावण अर्धे होई पर्यंत उकळून द्यावे आणि मग वापरावे

प्रति पंप 75 ते 100 ml

 

लेखन-
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147

महत्वाच्या बातम्या : –

जमिनीला देखील आच्छादनाची गरज

पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणारे, सामान्य जनता नाखूष

डाळिंबावरील रोग आणि रोगाचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या

जिवाणू स्लरी म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे जाणून घ्या

शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ

Leave a comment