मातीचा सामू कशाप्रकारे तपासावा ? जाणून घ्या

0

द्रावणाचा आम्ल-विम्ल निर्देशांक म्हणजे सामू! हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला पीएच अशी संज्ञा आहे. सामू पीएच मीटरवर मोजला जातो. त्याचा निर्देशांक 0 ते 14 पर्यंत असतो. जमिनीची आम्लता, तसेच विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो. सामू साडेसहापेक्षा कमी असल्यास जमिनी आम्लधर्मीय असतात.

अशा जमिनी अति पावसाच्या कोकण, तसेच गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत आढळतात. साडेसहा ते 7.3 पर्यंतचा निर्देशांक तटस्थता दर्शवतो. सामू 7.3 पेक्षा जास्त असल्यास जमिनी विम्लधर्मीय समजल्या जातात. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात अशा जमिनी जास्त आहेत. सामू साडेसहा ते 7.3 इतका असल्यास वनस्पतीला लागणारी बहुतांश अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

हा सामू असलेल्या जमिनीत सर्वच पिकांची वाढ चांगली होते. जमीन आम्लयुक्त असल्यास भात, नागली ही पिके आणि विम्लयुक्त असल्यास कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिके चांगली येऊ शकतात.

असा मोजतात मातीचा सामू :–

सामू हा पीएच मीटरच्या विद्युत यंत्राद्वारे अचूक मोजला जातो.

20 ग्रॅम माती घेऊन त्यामध्ये 50 मि.ली. डिस्टिल्ड वाॅटर टाकून अर्धा तास हलवून पीएच मीटरवरील रीडींगची नोंद घेतली जाते.

ढोबळ मानाने सामू ओळखायचा असल्यास लिटमस कागद पध्दतीचा अवलंब करतात.

हा लिटमस कागद ओल्या मातीत ठेवल्यास आम्ल-विम्लतेच्या प्रमाणानुसार रंगछटा बदलतात.

आम्लता असल्यास निळा लिटमस कागद लाल होतो, तर विम्लता असल्यास लाल लिटमस कागद निळा होतो.

यावरून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ढोबळ स्वरूपात काढता येतो.

महत्वाच्या बातम्या : –

मायकोरायझा म्हणजे नक्की काय आणि त्याचा वापर काय जाणून घ्या….

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय

जाणून घ्या चांगले कुजलेले सेंद्रीय खतबद्दल संपूर्ण माहिती

ई-नाम योजनेंतर्गत आणखी १००० नवीन मंडी सुरू करण्यात येणार , शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार

कृष्णा फळाच्या लागवडीतून विनोद पाटीदार कमवत आहे मोठा नफा

Leave a comment