राज्यात हायअ‍ॅलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं – राजेश टोपे

0

राज्यात हळू हळू  बर्ड फ्लूच्या आजाराने  डोकं वर काढण्यास सुरु केली आहे . बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअ‍ॅलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं

राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअ‍ॅलर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे बर्ड फ्ल्यूमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हायअॅलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

येत्या 16 तारखेलाच राज्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज 10 हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तातडीची गरज म्हणून राज्याला 16 लाख लसींची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती द्यावी आणि कोणती देऊ नये हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, असं सांगतानाच कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस आपल्याला मिळणार आहे आज ना उद्या कळेल, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या : –

अश्या प्रकारे तयार करा दशपर्णी अर्क

बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका – उद्धव ठाकरे

पुण्यातून कोरोना लसीची पहिली खेप रवाना

देवेंद्र फडणवीस यांनी बर्ड फ्लू बाबत व्यक्त केली चिंता

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत २० लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले: आरटीआय

 

Leave a comment