हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये आणि किमान २५०० रुपये दर

0

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये आणि किमान २५०० रुपये दर मिळाला. तर सरासरी २२५० रुपये दर मिळाला, अशी माहिती देण्यात अली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची ५० ते ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये होते.

सांगली : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची ९० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३००, तर सरासरी २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.शिवाजी मंडईत कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यांतून हिरव्या मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. २३) हिरव्या मिरचीची ८० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २२० ते २८०, तर सरासरी २५० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ८० पोत्यांची आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रति दहा किलोस २२० ते २८०, तर सरासरी २५० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची १०० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस २८० ते ३५०, तर सरासरी २४० रुपये असा दर होता. पुढील सप्ताहात मिरचीची आवक आणि दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची सुमारे १० ते १२ टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २५० ते ४०० रुपये दर होता. सध्या होणारी आवकही कर्नाटक, गुजरात राज्यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून होत आहे. परराज्यांतील आवक ही ८ ते १०, तर स्थानिक आवक ही २ ते ३ टेम्पो असल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची २८ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला सरासरी २७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. गत आठवाडाभरात आवक झालेल्या हिरव्या मिरचीला मिळालेले सरासरी आवक व दर पाहता गुरुवारी आवकेत घट, तर काही अंशी दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १७ डिसेंबरला ३९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. १९ डिसेंबरला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर १९००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० डिसेंबरला २३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. २१ डिसेंबरला मिरचीची आवक ३७ क्‍विंटल, तर सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २२ डिसेंबरला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. तर २३ डिसेंबरला सर्वाधिक ६३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर २२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नांदेड : येथील इतवारा तसेच तरोडानाका या भाजीपाला बाजारात सध्या हिरवी मिरची दरोज पंचवीस-तीस टन आवक होत आहे. या मिरचीला प्रतिक्विंटल दोन हजार ते अडीच हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापाऱ्यांनी दिली. नांदेड शहरातील इतवारा तसेच पूर्णा रोडवरील भाजीपाला बाजारात सध्या स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक सुरू आहे. तसेच इतर जिल्ह्यांतूनही हिरवी मिरचीची आवक होत आहे. सध्या आवक सर्वसाधारण असल्यामुळे दर ही सर्वसाधारण असल्याची माहिती मिळाली. नांदेड बाजारात पोपट्या रंगाच्या हिरव्या मिरचीला मागणी असते. ही मिरची स्थानिक शेतकऱ्यांसह लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसह कर्नाटक तसेच तेलंगणामधूनही आवक होते. गुरुवारी (ता. २४) बाजारात ३० टन हिरव्या मिरचीची आवक झाली. यास अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापारी मोहम्मद जावेद यांनी दिली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक वाढते आहे. पण दरामध्ये किरकोळ चढ-उतार वगळता दर मात्र स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २२०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ५० ते ८० क्विंटलपर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांपासून आवकेत वाढ होते आहे. पण दरात फारशी सुधारणा नाही, या सप्ताहात मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक २० ते ५० क्विंटलपर्यंत होती. तर दर किमान ११०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये होता. पंधरवड्यापूर्वीही दरात फारशी सुधारणा झाली नाही. आवकही तशी जेमतेम होती. तर मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ११०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर होता. १००-२०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर राहिले.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २८०० ते ४००० असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड आदी भागांतून होत आहे. दर स्थिर आहेत.

अकोला ः येथील जनता भाजी बाजारात हिरव्या मिरचीला गुरुवारी (ता. २४) २००० ते २५०० दरम्यान दर मिळाला. बाजारात ३५ ते ४० क्विंटल मिरचीची आवक झाली होती. बाजारात सध्या हिरव्या मिरचीचे दर स्थिरावले असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. गुरुवारी येथील बाजारात अंदाजे ३५ क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. मिरची कमीत कमी दोन हजार व २५०० रुपये जास्तीत जास्त दराने विकल्या गेली. किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये किलो दरम्यान विक्रेते करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजारात मिरचीचे दर स्थिरावले आहेत. जी फोर हिरवी मिरची २५०० दरम्यान विकत आहे. याच मिरचीचा उठाव बाजारात अधिक राहतो. येथील बाजारात अकोला जिल्ह्यासह इतर भागातील विक्रीसाठी येत आहे.

 

Leave a comment