हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर

0

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागांतून होत आहे. दोडक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५५० ते २५५० व सरासरी १९०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २८०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४४०० व सरासरी ३४०० रुपये दर मिळाला.

बाजारात मंगळवारी मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ५२०० व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भरताच्या वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २२०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भोपळ्याची १४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर होता.

काशीफळांची २७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६००ते २६०० व सरासरी २००० रुपये दर होता. कोबीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १७०० ते २७०० व सरासरी २१०० रुपये, असा होता. भेंडीची २४ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० व सरासरी १००० रुपये दर होता. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १८०० रुपये दर मिळाला.

 

 

Leave a comment