हरभरा : घाटे अळीचे नियंत्रण एकात्मिक व्यवस्थापन

0
हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असून, ते राज्यात साधारणत: १२.५० लाख हेक्टरवर घेतले जाते. विविध रोग व किडींमुळे हरभन्याचे उत्पादन कमी मिळते. हरभ-यावरील घाटेअळीपासून पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतक-यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा वापर करावा.
घाटे,अळी किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरित द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोन्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात.
एकात्मिक व्यवस्थापन:-
● उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यामुळे किर्डीचे कोष पक्षी वैचून आंतरपीक घेतल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
पक्षी थांबे हेक्टर 20 लावण्याचे नियोजन करणे :-
● पिकावर घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक म्हणजे शेतक-यांचे मित्र कार्यरत असतात व ते आपल्या उपजीविकेतून घाटे,अळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करीत असतात. घाटे,अळीचा प्रादुर्भाच वाढून उद्रेक होण्याची शक्यता असते. नैसर्गिक शबू कोटक जसे क्रायसोपा, लेड़ी बर्ड बीटल व रेड्युहीड़ ढेकूण तसेच घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून घाटेअळ्या वैचून त्यांचे केल्यास ते कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यांचे अळ्था चैचण्याचे काम सोपे होण्यासाठी शैतामध्ये पक्षी थांबे उभारावेत (प्रतिहेक्टर २० पक्षी थांबे).
5% लिंबोळी अर्क फवारने:-
● शेतक-यांनी पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोच्यावर आल्यानंतर सर्वप्रथम वनस्पतिजन्य किंवा जेंचिक कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ऑझंड़ीरेंक्टीन 300 पीपीएम ५0 मिलि. प्रति 10 लिटर पाणी किंवा
खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पावर पंपाने फवारणी करायची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
१) क्रेिनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मिलिं.
२) इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ३ ग्रॅम
३) डेल्टामेश्रीन २.८ टक्के प्रवाही १० मिलेि.
४) लॅमडा साथहॅलोमेश्रीन ५ टक्के प्रचाही १० मिलि.
५) क्लोरेंट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिलि
अळ्या दिसू लागताच घाटेअळीचा विषाणूएचएनपीव्ही हेक्टरी ५०० एल.ई ५० ग्रॅम राणीपाल किंवा वातावरणात सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्यास व्यूहेरीया बॅसीयांना या जैविक बुरशीनाशक ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे कराची. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन तिच्या नैसर्गिक शत्रू कीटकांना अपाय न होता त्यांचीसुद्धा घाटेअळीचे नियंत्रण करण्यास मदत होईल.
घाटेअळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास (सरासरी १ अळी प्रति मीटर ओळीत किंवा ५ टक्के घाट्यांचे नुकसान) शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा; अन्यथा फवारणी टाळावी. वरील प्रादुर्भाव पातळी गाठल्यानंतर फवारणी केल्यास आपल्या उत्पादनामधील घट टाळून फवारणीचा खर्च भरून निघेल; अन्यथा फवारणीचा खर्च वाया जाऊ शकतो, याची शेतक-यांनी कृपया नोंद घ्यावी .
Leave a comment