संकटात असलेल्या शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करावी – एकनाथ शिंदे

0

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर असल्याची टीका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीची भूमिकाच मांडली असल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज शेतकरी संकटात आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी व चर्चा करून समस्या सोडवावी. हीच महाविकास आघाडीची भूमिका असून, महाविकास आघाडीने शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाचे कामच टीका करणे आहे. मात्र राज्य सरकारने मागील एका वर्षात कर्जमाफी असो की नैसर्गिक संकटात देखील मदत पॅकेज दिले. कोरोना संकटातही विकासाची कामे सुरू आहे.

ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत शिंदे म्हणाले की, यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. अन्यथा सरकारच्या अशा एजेंसीवर प्रश्न निर्माण होतील.

Leave a comment