घेवडा लागवड पद्धत 

0

जमीन – हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी.

हवामान – समशीतोष्ण.

पूर्व मशागत – दोन वखर पाळ्या.

लागवड कालावधी – जानेवारी / फेब्रुवारी, जून / जुलै.

बियाणे निवड – कंटेंडर, फुले सुयश, फुले सुरेखा.

लागवड पद्धत – सपाट वाफे केल्यास ३/४ फुट रुंदीचा वाफा, ६० बाय ३० सेमी अंतरावर. सरी वरंबा असल्यास दोन ओळीत ४५ सेमी तर दोन रोपात ३० सेमी अंतर.

बीज प्रक्रिया – एका किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम चोळावे. एकरी १५ किलो बियाणे.

खत व्यवस्थापन- एकरी १० टन शेणखत लागवड करताना एकरी ५० किलो युरिया, १०० किलो सुपर फोस्फेट आणि ५० किलो पोटाश. ३० दिवसांनी युरियाचा दुसरा हप्ता.

पाणी व्यवस्थापन – उन्हाळ्यात दर चार दिवसांनी पाणी पाळी, पावसाळ्यात गरजेनुसार.

रोग / किडी – मावा, तुडतुडे यासाठी क्लोरोपायरीफोस तर भुरी, करपा साठी कॉपर ओक्सिक्लोराइड आणि खोड माशीसाठी सायपरमेथ्रीन फवारावे.

काढणी – ४५ दिवसांनी तोडे सुरु होतात ११० दिवसापर्यंत, शेंगांचे उत्पादन एकरी ४० क्विंटल बियांचे उत्पादन एकरी ४/५ क्विंटल.

महत्वाच्या बातम्या : –

उन्हाळी मुगाचे उत्पादन तंत्रज्ञान

महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध

कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही उपाय

Leave a comment