जुने-उतारे अन् फेरफार अर्ज मिळवा ऑनलाईन, वाचा संपूर्ण प्रक्रिया

0

सध्याच्या काळामध्ये जमिनीचा व्यवहार हा फारच गुंतागुंतीचा असतो. यामुळे जमिनीचे व्यवहार हा काळजीपूर्वक करावे लागतात. नाहीतर लाख रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक वाद निर्माण होतात. पर्यायाने कोर्ट कचेऱ्याच्या खेट्या माराव्या लागतात या सर्व प्रकारात आपला मोठा पैसा जात असतो. त्यामुळे जमीन खरेदी पूर्वी त्या जमिनीचा पूर्वइतिहास काय आहे? हे जाणून घेणे फार महत्वाचे ठरते.

जमिनीसंबंधीची कागदपत्रे यांच्या विचार केला तर फेरफार उतारे, खाते उतारे, सातबारा इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र असतात. महाराष्ट्र शासनाच्या भुमिअभिलेख कार्यालयाकडे जवळजवळ १८८० पासून जमिनीचे संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या संबंधित पोर्टलवर जमिनी संबंधीच्या सगळ्या आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याने तहसील आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. सरकारच्या ई अभिलेख कार्यक्रमाद्वारे जवळजवळ ३० कोटी जुने उतारे उपलब्ध करून दिले आहेत. सध्या या पोर्टलवर १४ लाख २२ हजार २५८ कागदपत्र डाउनलोड केलेली आहेत.संबंधित माहिती मिळवण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov. या वेबसाईटवर जावे लागेल.

या संकेतस्थळावर गेल्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड बटनांच्या खाली मदत या पर्यायावरुन वेबसाईटद्वारे डाऊनलोड करण्यासाठी कोण-कोणती कागदपत्र उपलब्ध याबद्दलची माहिती शोधण्यासाठी लॉगिन करावे लागेल. यासाठी नवीन लॉगिन कसे तयार करावे? पासवर्ड कसा बदलावा? मूलभूत शोध आणि प्रगत शोध यामध्ये काय फरक आहे? योजना बटन कधी वापरावे? या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात.

त्यानंतर या वेबसाईटवर जुन्या अभिलेख पाण्यासाठी वरती दिलेल्या संकेत स्थळावर परत सर्च करा. त्यानंतर महसूल विभागाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर पेजवरील ईरेकॉर्ड पाहण्यासाठी ई रेकॉर्डस पर्यावरण क्लिक केल्यावर महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे पेज समोर आल्यानंतर त्यात उजवीकडील भाषा पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा. त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी लॉगिन व मदत ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाइटवर नोंदणी केली असेल तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून साइटवर जाऊ शकतात. नोंदणी केली नसेल तर नवीन वापर करता नोंदणीवर क्लिक करून त्या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा. त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करतात, तुमची बर्थ डेट इत्यादी वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्ता विषयीचे रकाने भरा.

यानंतर लॉग इन आयडी तयार झाल्यानंतर संकेतस्थळाच्या निर्देशानुसार पासवर्ड टाका. त्यानंतर त्या चौकटीत कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. त्यानंतर कॅप्टचा कोड चौकटीत जसाचा तसा टाका. शेवटी सबमिट बटन वर क्लिक करून वापर करता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली येथे क्लिक करा लॉग इन करण्यासाठी असा मेसेज येईल इथे क्लिक करा वर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉगिन करा.

फेरफार उतारा कसा पाहावा?

वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा त्यानंतर तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, आठ अ असे पर्याय निवडा. या संकेतस्थळावर जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार उपलब्ध आहेत. यानंतर गट नंबर टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करा. यानंतर सर्च रिझल्ट या पेजवर तुम्ही टाकलेला गट क्रमांकाचे संबंधीत फेरफार ची माहिती दिसते. फेरफाराची वर्ष, क्रमांक दिलेला असतो, त्या क्रमांकावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पहा. त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुनरावलोकन कार्ट ओपन होईल. त्याखाली दिलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की, डाउनलोड सारांश पेज ओपन होईल. येथे तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे असे दिसल्यानंतर त्यासमोर फाईल पहा या पर्यायावर क्लिक केल की, फेरफार पत्रक ओपन होईल.

Leave a comment