‘शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी’, काँग्रेस नेत्याने व्यक्त केली इच्छा

0

गेली एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र अनेकदा सरकारशी चर्चा होऊन देखील अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि आणि केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींनी मध्यस्थी करावी’, अशी इच्छा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब, नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी. केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरी यांनी तोडगा काढावा अशी इच्छा व्यक्त केली.

तर, यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कामाचे कौतुक केले. आपण विधानपरिषदेपासून अनिल परब यांचे काम पाहत आहोत. आता परिवहन विभागातही अनिल परब चांगले काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवहन विभाग चांगले बदल घडवून आणेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या : –

नैसर्गिकरित्या करूयात पीकामधील कीड नियंत्रण

कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या ‘या’ दोन मागण्या सरकारने केल्या मान्य

शेतकऱ्यांना मिळतय माशांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण

आले आणि हळद पिकातील बुरशी नियंत्रण…

जुने-उतारे अन् फेरफार अर्ज मिळवा ऑनलाईन, वाचा संपूर्ण प्रक्रिया

 

Leave a comment