
शेळीपालनासाठी करताय; मग जाणून घ्या! शेळीच्या विक्रीसाठी असलेले भारतातील महत्त्वाचे बाजार
काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक असते. यासाठी जर आपण शेळीपालनाचं शास्त्र प्रशिक्षण घेऊन जाणून घेतलं तर तुम्हाला शेळपालनात नफा मिळालाशिवाय राहणार नाही. त्यातील काही गोष्टी आपण जाणून घेऊ..
योग्य जागेची निवड –
- भारतातील कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही ठिकाणी शेळीपालन करता येते. जर तुमच्या घराशेजारी तुमचा गोट फॉर्म असेल तर उत्तम किंवा तुमच्या फॉर्मपासून बाजार जवळ असल्यास उत्तम.
- शेळीच्या गोठ्यासाठी योग्य आणि स्वच्छ जागा निवडा. त्या जागेशेजारी पिके, गवत, चारा पिकवा येईल का याचा विचार करा. जेणेकरून चारा
- वाहततुकीचा खर्च कमी होईल. शिवाय चाऱ्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार नाही.
- शहरातील बाजाराजवळ तुमचा गोट फॉर्म असणे आवश्यक.
- तुमच्या परिसरात पशुंचा वैद्यकीय दवाखाना किंवा औषधालय आहे का याची खात्री करा. जर गाव आणि शहराजवळ तुमचा गोट फॉर्म असेल तर तुमचा दुप्पट फायदा होईल. एक बाजारपेठ जवळ राहिल आणि दुसरी गोष्टी म्हणजे गावात तुम्हाला कमी पैशात गोट फॉर्मसाठी कमी पैशात जमीन मिळेल. शिवाय कमी पैशात तुम्हाला मजूर मिळतील.
दरम्यान शेळीपालन करण्याआधी आपण हे का करत आहोत याचा विचार करा. म्हणजे आपल्याला फक्त मांससाठी गोट फॉर्म टाकयचा आहे का, इतर गोष्टींसाठी म्हणजे, फायबर, कातडी, दूध उत्पादन. बरेचसे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते. जर तुम्ही मांस आणि दुधासाठी शेळीपालन करत असाल तर या दोन्ही गोष्टींना भारतात मोठी मागणी आहे.
हेही वाचा : शेळीपालन करत असाल तर; काळजी घ्या हे दोन रोग ठरू शकतात शेळीसाठी घातक
भारतातील राज्यात असलेले शेळी बाजार
महाराष्ट्र – देवणार (Deonar) बकरा बाजार मंडी हे भारतातील सर्वात मोठा बकरी बाजार आहे.
आंध्र प्रदेश – गुडूर शीप गोट मार्केट, हे या राज्यातील सर्वात मोठा बकरी बाजार आहे.
गोवा – येथील मपुसा म्युनसिपल मार्केट
आसाम – बिस्मिल्लाह गोट फॉर्म
बिहार – सिवान फॉर्म
हिमाचल प्रदेश – कमल गोट मार्केट. हा बाजार हरीनगर, सुंदर नगरमध्ये आहे.
जम्मू – काश्मीर – शीप हसबंड्री सेंटर बाजार.
हरियाणा – एसआर कर्मशिय गोट फॉर्म
कर्नाटका
झारखंड – अकाश गोट फॉर्म
केरळ – कलमापूर बाजार
तेलंगाणा – मिरीलागुडा मार्केट
तमिळनाडू – कुंद्ररापल्ली
पश्चिम बंगाल – आझाद ट्रान्सपोर्ट गोट फॉर्म.
उत्तर प्रदेश – न्यू गोट्स अँण्ड शीप मार्केट