एलआयसीच्या आम आदमी बीमा योजनेत 100 रुपये जमा केल्यानंतर 75000 रुपयांचे इंश्योरेंस मिळणार, कसं ते जाणून घ्या

0

जर आपण गरीबी रेषेच्या श्रेणीत येत असणार, तसेच स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर आपण भारत सरकारच्या विशेष योजनेचा लाभ घेऊ शकता, खरं तर भारत सरकार द्वारा गरीबांसाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजनांची सुरुवात करण्यात येत आहे.

या योजनांचे उद्दीष्ट हे आहे की गरीब लोकांच्या जीवनात समृद्धी असली पाहिजे तसेच सामाजिक सुरक्षा देखील मिळायला हवे. हे लक्षात घेऊन लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशनने आम आदमी बीमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विमाधारकास अनेक फायदे दिले जातात.

एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ

– विमाधारकाच्या नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूच्या व्यतिरिक्त, अपंगत्व देखील या योजनेत समाविष्ट केले गेले आहे.

– विम्याच्या कालावधीत विमा भरणाऱ्या व्यक्तिची नैसर्गिक मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्तीला 30 हजार रुपये दिले जातात.

– अपघाती मृत्यूमध्ये 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

– कायमस्वरुपी अपंगत्व मध्ये 75 हजार रुपये देण्यात येणार आहे.

मुलांना मिळणार स्कॉलरशिप

जर विमाधारक मरण पावला तर त्याच्या मुलांना स्कॉलरशिपची सुविधा देखील दिली जाते. ही एक एड-ऑन सर्विस आहे, त्याअंतर्गत 2 मुलांना स्कॉलरशिपची सुविधा मिळेल, जे वर्ग 9 ते 12 पर्यंत शिकतील. या योजनेंतर्गत त्यांना दरमहा 100-100 रुपये दिले जातील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा

विमाधारकाचे वय 18 ते 59 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी दारिद्र्य रेषेच्या खाली असणे महत्वाचे आहे. या योजनेंतर्गत 48 व्यवसाय गट स्थापन करण्यात आले आहेत. यात सामील झालेल्या व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 फक्त 100 रुपये प्रीमियम

जर आपण या योजनेतील प्रीमियमबद्दल चर्चा केली तर या अंतर्गत वार्षिक प्रीमियम केवळ 200 रुपये आहे. यापैकी सरकार 100 रुपये जमा करते, नंतर विमाधारकाला 100 रुपये जमा करावे लागतात. जर विमाधारक ग्रामीण भागाचा असेल, सोबतच त्याच्या जवळ स्वत: च्या मालकीची जमीन नसेल आणि तो 48 व्यावसायिक गटांमधून येत असेल तर त्याला 100 रुपये द्यावे लागणार नाहीत.

3 श्रेणीतील लोकांना फायदा 

गरीबी रेषेखालील लोक, ज्यांना 50 टक्के म्हणजे 100 रुपये द्यावे लागतात.

ग्रामीण भागातील लोक ज्यांच्याकडे जमीन नाही.

याशिवाय 48 व्यवसायांसोबत संबंध ठेवणारे लोक जसे की बीडी कामगार, सुतार, मच्छीमार, हस्तकलेचे व्यापारी लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकांचं मोठं नुकसान

कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता

उत्तराखंडनंतर आता ‘या’ राज्यात गांजाची लागवड वैध होऊ शकते, वाचा सविस्तर

जर विक्रेता रेशन देण्यास नकार देत असेल तर या क्रमांकावर कॉल करा, त्वरित कारवाई केली जाईल

Leave a comment