मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याने शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी 13 शेतकऱ्यांवर हत्या आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांविरोधात अंबाला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरात पाहण्यास मिळत आहे. कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवले.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अंबाला शहरात आले होते. यावेळी त्यांचा ताफा अडवून रकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. काही शेतकऱ्यांनी ताफ्याच्या दिशेने लाठ्याही फेकल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने काँग्रेसने टीका केले असून, हरयाणा सरकारने शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून सर्व मर्यादा ओलांडल्या अशल्याची टीका, . हरियाणाच्या काँग्रेस प्रमुख कुमारी शैलजा यांनी केली आहे.