महाराष्ट्रातील विविध भागात मेथी २५० ते ३००० रुपये शेकडा
पुणे येथील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेथीच्या सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली होती. यावेळी शेकड्याला ४०० ते ८०० रुपये दर होता. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात मेथीच्या सुमारे ७५ हजार जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेकड्याला ७०१ ते १ हजार ८०० रुपये दर होता.
परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला प्रतिशेकडा कमाल २५० ते किमान ५०० रुपये, तर सर्वसाधारण ३७५ रुपये दर मिळाले. सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील लोहगाव, सिंगणापूर, इटलापूर, उजळंबा, बोरवंड आदी गावातून मेथीची आवक होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मेथीची आवक अगदीच कमी झाली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. मेथीला शंभर पेंढ्यांना किमान ३०० रुपये, सर्वसाधारण ५०० रुपये आणि सर्वाधिक ७०० रुपये दर मिळाला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीची ११ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १२०० व सर्वसाधारण १००० असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, धरणगाव आदी भागातून होत आहे. दर स्थिर आहेत.
अकोला येथील मेथीचा हंगाम सध्या अंतिम टप्यात आला आहे. मेथीला किमान ६०० ते कमाल १५०० रुपयांचा दर मिळाला. मेथीची ८० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती.
नांदेड बाजारात सध्या मेथीची आवक वाढल्यामुळे दरात स्थिरता आली आहे. इतवारा तसेच तरोडा भागात सध्या रोज २५ हजार ते ३० हजार जुड्या आवक होत आहे. यास प्रतिशेकडा ३५० ते ४०० रुपये शेकडा दर मिळत आहे.
नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीची आवक ५५०० जुड्या झाली. प्रति १०० जुड्यांना १००० ते ३०००, तर सर्वसाधारण दर २००० रुपये होते. आवक सर्वसाधारण असून गेल्या तीन दिवसांत दर स्थिर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या : –
जमिनीवर बसून जेवणा केल्याने होतात अनेक मोठे फायदे
शेती विश्वात ‘या’ पिके मॉडेलची चर्चा
‘कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करु नका’
शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका