अबब..! जंगली गव्यांना दररोज पाव खायला देणं पडलं महागात

0

महाबळेश्वरमध्ये एक व्यक्ती जंगली गव्यांना पाव खायला घालत होता, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तो तातडीने थांबवावा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?

इब्राहिम महंमद पटेल यांच्या नावे महाबळेश्वरजवळ शेती आणि हॉटेल आहे. त्यांच्या शेतात गेल्या काही महिन्यापासून गवे चरायला येत होते. प्राण्यांवर दया दाखवत पटेल यांनी या गव्यांना पाव खायला देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हा रोजचा उपक्रम झाला.

काही काळानंतर दोघांचीही भीती संपली आणि पटेल गव्यांना आपल्या हाताने आता पाव भरवू लागले होते. नंतर पटेल यांचा एक व्हिडिओ समोर आला जो सोशलवर व्हायरल झाला. वनविभागाने या व्हिडिओची दखल घेत पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवला आहे.

वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधीनियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी याबाबत माहिती दिली.

वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना  त्या गोष्टींची व तश्या वातावरणाची सवय लागते. ज्यावेळी हे पदार्थ त्यांना मिळत नाहीत, तेव्हा ते माणसांवर हल्ले करून त्यांच्या हातातून त्या गोष्टी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे माणसाच्या किंवा वन्यजीवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. वन्यजीवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात’, असा धोक्याचा इशाराही प्राणीप्रेमींनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

जनावरांची तहान भागवण्यावरही होतोय आक्षेप, काय आहे नेमक प्रकरण ? वाचा सविस्तर..

उपवासाला का खातात वरईचा भात? काय आहेत फायदे?

रासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी ? वाचा सविस्तर

हळदीचे किती सेवन करावे आणि काय आहेत त्याचे फायदे एकदा नक्की वाचा

शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार व्यतिरिक्त आणखी 3 हजार रुपये मिळतील, लवकर करा नोंदणी

 

Leave a comment