“सेंद्रिय कर्बचे अनुकूल परिणाम”

0

१. भौतिक

सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकण मातीची संयोग पावून चिकणमाती ह्युमस संयुक्त पदार्थ तयार होतो. ह्युमसची सेंद्रिय कर्बाच्या अवस्थेतील उपलब्धता भौतिक अनुकूल प्रभाव पाडते. जमिनीची घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवते. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तसेच पाणी मुरण्याची अवस्था आणि निचऱ्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप थांबते. तिची जलवाहक शक्ती वाढते. जमिनीची जडणघडण रचना अनुकूल होते.

२. रासायनिक

विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणेत्तोर प्रमाण ४०.१ ते ९०.१ पर्यंत असते. ह्युमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५.० ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के असते. सुपीक जमिनीतील ह्युमसचा कर्ब नत्र ९ः१ ते १२ः१ च्या दरम्यान असतो. गुणोत्तराचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय खत कुजण्यास वेळ जास्त लागतो. साधारणतः १३ः१ ते १६ः१ कर्ब-नत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरले आहे. त्याचा परिणाम खालील बाबींवर होतो.

रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते….

– नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
– रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
– स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
– सेंद्रिय कर्बातील फल्विक आम्ल आणि अन्य ह्युमिक पदार्थांमुळे रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पदार्थांचा ऱ्हास अथवा स्थिरीकरण न होता विद्राव्य स्वरुपात ते पिकांना उपलब्ध होते.
– जमिनाचा सामू उदासीन (६.० ते ७.०) ठेवण्यास मदत होते.
– आयन विनिमय क्षमता वाढते.
– चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

३. जैविक

सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीवांच्या उत्पादन क्रियेस गती प्राप्त होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते. सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धेवर चांगला परिणाम होतो. सेंद्रिय निविष्ठांचा वापर करताना आपल्याकडे असलेले शेणखत चांगल्या प्रतिचे कसे राहील याकडे लक्ष द्यावे. ज्या प्रदेशात पाऊस पडतो तेथे ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे. सेंद्रिय खत चांगले कुजवावे. अन्यथा शेणखतातील तणांचा प्रादुर्भाव वाढेल.

जैवीक शेतकरी
शरद केशवरावबोंडे
९४०४०७५६२८

Leave a comment