शेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा

0

शेतकऱ्यांचे दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन आता सुद्धा सुरुच आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून याचाच भाग म्हणून आता ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे.सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेडस आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांनी संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला.

सिंधु सीमेवर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घराण्यांना भाजपा विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. सुरक्षा बलाचा वापर करुन शेतकऱ्यांना थांबवले. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, दिल्ली- हरयाणाच्या सिंधु सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात वकील ओम प्रकाश परिहार यांनी दाखल केली आहे.

Leave a comment