“शेतकऱ्यांनो, आपल्या गायी – म्हशींचे फोटो पाठवा आणि कमवा 2000 रुपये”
सेल्फी स्पर्धेबद्दल तुम्ही बरेचदा ऐकले असेलच पण आज आम्ही तुम्हाला कॅटल कॉन्टेस्ट बद्दल सांगणार आहोत. गाय व म्हशी असलेला कोणताही शेतकरी या स्पर्धेत भाग घेऊन चांगले पैसे मिळवू शकतो. यासाठी आपल्यास फक्त आपल्या प्राण्यांचे फोटो क्लिक करावे लागेल आणि ते इंटरनेटवर पाठवावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवावे लागेल.
आपल्याला किती पैसे मिळणार ?
महत्त्वाचे म्हणजे animall.in नावाची वेबसाइट ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी आयोजित करीत आहे. यात भाग घेण्यासाठी, फक्त ऐप्लीकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये आपला प्राण्यांचा फोटो पोस्ट करा. 2100 रुपये प्राण्यांच्या मालकास देण्यात येतील ज्याला सर्वाधिक पसंती मिळतील.
स्पर्धेचे नियम
या स्पर्धेचे काही नियम आहेत. जसे आपण तेथे फक्त आपला स्वतःचा प्राण्यांचा फोटो पोस्ट करू शकता. इतर कुठल्याही ठिकाणी घेतलेला फोटो किंवा इंटरनेट वरून कॉपी केलेला एखादा फोटो वैध ठरणार नाही व तेथून लगेच काढला जाईल.
त्याचप्रमाणे, फोटो त्याच्या मूळ स्वरुपात असावा. फोटो अधिक सुंदर बनविण्यासाठी कोणतेही एडिटिंग नसावी. कलात्मकता फोटोंना प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कसा करावा
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला फक्त animall.in वेबसाइटवर जाऊन स्पर्धा पर्यायावर जावे लागेल. येथे आपल्याला प्राणी स्पर्धांचा एक बॉक्स दिसेल, जिथे आपल्याला आपले नाव, मोबाइल नंबर आणि प्राण्यांचा फोटो प्रविष्ट करावा लागेल.
महत्वाच्या बातम्या : –
गोबरधन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी गोबरधनचे एकात्मिक पोर्टल केले सुरू
मार्बलचा व्यवसाय सोडून लिंबाची शेती करीत ‘हा’ शेतकरी कमावतोय 8 लाख रुपये
हिंदू धर्मानुसार गाई पाळण्याचे ‘हे’ आहेत नियम
शेतकर्याने सुरु केला एक आगळावेगळा स्टार्टअप, उघडली स्वत:ची बकरी बँक