शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

0

गेली 2 महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. अद्याप या कायद्यांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. अशातच केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे 30 जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहेत.

अण्णा हजारेंनी आपला निर्णय बदलावा व आंदोलन करू नये, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांकडून त्यांची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन हे देखील भेटले. फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिलेले पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांना दिले. मात्र तरीही आंदोलनावर ठाम असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.

अण्णा हजारे यांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले. त्यांना सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनांवर चर्चा झाली. त्यातील काय काय पूर्तता झाली, भविष्यात काय निर्णय अपेक्षित आहेत, यावर चर्चा झाली, असे भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : –

‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका

द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता

जाणून घ्या औषधी वेल कलिहारीची लागवड कशी करावी

जनधन योजनेंतर्गत ४१ कोटीहून अधिक लोकांनी या खात्याचा घेतला लाभ

पुढील काही दिवस राज्यातील थंडीत चढ-उतार

Leave a comment