नवीन तंत्रज्ञानाने शेती करुन तीन वर्षात फुलले शेतकऱ्याचे नशीब

0

आता बरेच शेतकरी आधुनिक शेती करून यश मिळवत आहे. पुर्व उत्तर प्रदेशातील चांदुली येथे असे काही शेतकरी आहेत की ज्यांनी पारंपरिक शेतीचा त्याग करून नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करायला सुरुवात केली आहे. चंदौली येथील शेतकरी पारंपरिक पिके सोडून टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची तसेच फळबागांमध्ये केळी, पपई, स्ट्रॉबेरी यासारख्या फळझाडांची जवळ जवळ १०० बिघा क्षेत्रात लागवड करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे आणि उत्पन्नात चांगली वाढ होताना दिसत आहे.

त्यामुळे शेतीचे चित्र सोबत त्यांचे नशीब देखील बदलले आहे. चंदौलीचे शेतकरी जयंत सिंग आणि राहुल मिश्रा यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मागच्या तीन वर्षात प्रगत वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान युक्त पद्धतीचा वापर करून शेतीचे चित्र पलटले आहे.

पहिल्या वर्षी या शेतकऱ्यांनी पपई आणि केळीची लागवड केली. जेव्हा त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला, तेव्हा  त्यांनी ही पिके मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला. आज हे शेतकरी जवळपास १०० बिघामध्ये याप्रकारे शेती करीत आहेत.

तसे पाहिले तर, चंदौली जिल्ह्यातील देवरा खेड्यातील रहिवासी मिश्रा आणि जोडा हरदन गावचे जयंत सिंग आणि त्यांचे तीन मित्र यांनी मिळून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गावातील काही लोकांनी त्यांचा विरोध केला, इतकेच नाही तर अनेकांच्या टीकेल आणि चेष्टेला सामोरे जावे लागले. तरीही या शेतकऱ्यांनी कोणाकडे लक्ष न देता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.

पीक तयार झाल्यानंतर हे फळे आणि भाज्या वाराणसीच्या बाजारात नेऊन विकतात त्यातून त्यांना चांगल्या प्रकारे नफा मिळवून त्यांच्या आर्थिक प्रगती होत आहे.

रवी सिंग यांनी सांगितले की, मी एक वर्षापूर्वी या प्रकारची शेती सुरू केल्याने उत्पादन वाढले आहे. त्यामुळे माझ्या जिवांशैली ते बरीच प्रकारचा बदल झालेला आहे. जिल्ह्यातील शेतकरी कृषी विधेयकास संमती देतात आणि ते म्हणतात की, हे कृषी बिल शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे याला विरोध करणे योग्य नाही

अनुप मिश्रा या शेतकऱ्यांनी सांगितले की, यापूर्वीही शेतात गहू आणि बाजरीची पीक असायचे परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा मी कृषी प्रदर्शनात रोपे लावली तेव्हा मला वाटले की ते आपल्या शेतात का वापरू नयेत. यानंतर पाच जणांचा गट तयार करून आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली ज्यामध्ये त्यांना चांगला नफा मिळाला.

.

Leave a comment