राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहित शेतकऱ्याची आत्महत्या

0

संत्र्याच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळविण्यासाठी चिठ्ठी लिहित आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी अशोक भुयार यांनी आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता. शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी शेतामध्ये जबरदस्तीने मद्यप्राशन करुन त्यांना पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेऊन शेतकऱ्याला मारहाण केली होती.

संत्रा व्यापारी व अंजनगाव पोलिसांकडून मारहाण केल्याची चिठ्ठी आत्महत्येपुर्वी शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्या नावे न्याय मिळण्याच्या हेतूने लिहून ठेवली.

Leave a comment