‘मोदी सांगतील त्या दराने शेतमाल खरेदी करा, असे फडणवीसांनी शेतकऱ्यांना सांगावे’

0

मागील एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर कृषी कायदे हे अंबानी-अदानी या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

टाळेबंदी काळामध्ये अंबानी-अदानी या उद्योगपतींना मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या बाजारामध्ये केंद्र शासन उतरवत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, बडे भांडवलदार मागतील त्या दराने धान्य शेतकऱ्यांना शेतमाल शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मोदी सांगतील त्या दराने शेतमाल खरेदी करा, असे फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगावे. आत्मनिर्भरतेचे ढोल वाजवणाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.

‘कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी; काही फरक पडणार नाही’ असा टोला देखील त्यांनी ल्हापूर- सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’च्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी लगावला.

Leave a comment